रणबीर कपूरने गमावले ‘तख्त’! रणवीर सिंग ठरला कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 13:26 IST2018-08-12T13:24:23+5:302018-08-12T13:26:28+5:30
करण जोहरच्या ‘तख्त’ची घोषणा झाली आणि या मेगा प्रोजेक्टबद्दल चर्चा सुरू झाली. या ऐतिहासिक चित्रपटात करण जोहरने बड्या-बड्या स्टार्सला कास्ट केले आहे. साहजिकचं यामुळे मीडियात चित्रपट चर्चेत आहे.

रणबीर कपूरने गमावले ‘तख्त’! रणवीर सिंग ठरला कारण!!
करण जोहरच्या ‘तख्त’ची घोषणा झाली आणि या मेगा प्रोजेक्टबद्दल चर्चा सुरू झाली. या ऐतिहासिक चित्रपटात करण जोहरने बड्या-बड्या स्टार्सला कास्ट केले आहे. साहजिकचं यामुळे मीडियात चित्रपट चर्चेत आहे. रणवीर सिंग, करिना कपूर, विकी कौशल, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर, अनिल कपूर लोकप्रीय कलाकारांनी सजलेल्या या चित्रपटाबद्दल आणखी एक रोचक माहिती कानावर येतेय. होय, चर्चा खरी मानाल तर हा चित्रपट रणबीर कपूरलाही आॅफर झाला होता. पण त्याने यात काम करण्यास नकार दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगच्या भावाची भूमिका रणबीरला आॅफर केली गेली होती. त्याला स्क्रिप्टही आवडली होती. पण आपल्याला रणवीरचे भाऊ बनायचेयं, हे कळले आणि त्यांनी या चित्रपटाला थेट नकार देणे योग्य समजले. रणबीरच्या नकारानंतर ही भूमिका विकी कौशलच्या झोळीत पडली.
आता रणबीरने रणवीरसोबत काम करण्यास नकार का दिला, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. याचे थेट कनेक्शन दीपिका पादुकोणशी जुळलेले आहे, हेही तुम्हाला ठाऊक आहेच. शेवटी आपल्या एक्स गर्लफ्रेन्डच्या बॉयफ्रेन्डशी काम करणे कुणाला आवडेल?
तूर्तास रणबीर अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’मध्ये बिझी आहे. याशिवाय यशराज फिल्म्सच्या ‘शमशेरा’ आणि लव रंजन यांचा एक चित्रपटही त्याने साईन केला आहे.