‘मणिकर्णिका’च्या वादावर बोलला सोनू सूद, कंगना राणौतची केली बोलती बंद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:38 IST2018-09-01T16:24:11+5:302018-09-01T16:38:56+5:30

कंगना राणौतचा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमात दुसरी मुख्य भूमिका करणारा अभिनेता सोनू सूदने सिनेमामध्येच सोडून दिला आहे.

Sonu sood tallk about manikarnika issue, keep everyone mouth shut | ‘मणिकर्णिका’च्या वादावर बोलला सोनू सूद, कंगना राणौतची केली बोलती बंद !

‘मणिकर्णिका’च्या वादावर बोलला सोनू सूद, कंगना राणौतची केली बोलती बंद !

ठळक मुद्दे सोनू यात महत्त्वाची भूमिका साकारत होतामात्र कंगनाला कंटाळून त्यांने हा सिनेमा सोडला

कंगना राणौतचा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमात दुसरी मुख्य भूमिका करणारा अभिनेता सोनू सूदने सिनेमामध्येच सोडून दिला आहे. तसे म्हटले तर सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून आता पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहे पण चित्रपटातले काही दृश्य पुन्हा चित्रित करण्यासाठी सोनू सूदला सांगितले गेले होते. सोनू सूद या सिनेमात मराठा सदाशिव राव भाऊची भूमिका साकारत होता. सोनू सूदचे म्हणणे होते की कंगनाच्या हट्टाला कंटाळून त्यानी हा चित्रपट सोडला आहे. 

त्यानंतर कंगनाने ही आपले मत व्यक्त केले आहे. कंगना म्हणते की सोनू महिला दिरदर्शकाच्या हाताखाली काम करायला तयात नव्हता त्यामुळे त्याने हा सिनेमा सोडला. माझ्या पूर्ण टीमला माझ्यावर विश्वास आहे पण कदाचित सोनूला तो नसावा, त्याने मला माझी बाजू मांडायची संधी सुद्धा दिली नाही. कंगनाच्या या वक्तव्यानंतर सोनू म्हणाला "मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मला या पुढेही स्त्री दिग्दर्शिकेसोबत काम करायचे आहे. जर मला तसा प्रोब्लेम असता तर मी फराह खान दिग्दर्शित हॅपी न्यू इअरमध्ये काम केले नसते. मी हा सिनेमा काही वेगळ्या कारणांमुळे सोडला आहे.  

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत आहे. कंगना राणावत ही राणी लक्ष्मीबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे मेकिंग बजेट 120 कोटींपेक्षा जास्त आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Sonu sood tallk about manikarnika issue, keep everyone mouth shut