अखेर ‘केदारनाथ’ पावला! शूटींग संपले, रॅप अप पार्टीही संपली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 04:54 PM2018-07-02T16:54:51+5:302018-07-02T16:55:44+5:30

ऐनवेळी निर्माता आणि दिग्दर्शकामधील वादामुळे या सिनेमाचे शूटींग थांबले होते. तिकडे डेब्यू सिनेमा असा रखडल्याने साराची चिंताही मात्र वाढली होती.

sara ali khan and sushant singh rajput at the kedarnath wrap up party | अखेर ‘केदारनाथ’ पावला! शूटींग संपले, रॅप अप पार्टीही संपली!!

अखेर ‘केदारनाथ’ पावला! शूटींग संपले, रॅप अप पार्टीही संपली!!

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान सध्या रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या चित्रपटात बिझी आहे. खरे तर सारा अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’द्वारेबॉलिवूड डेब्यू करणार होती. पण या चित्रपटाच्या निर्मात्या अन् दिग्दर्शकामध्ये असा काही वाद पेटला की, ‘केदारनाथ’ रखडला. आता स्थिती ही आहे की, ‘सिम्बा’ हा सिनेमा ‘केदारनाथ’च्या आधी रिलीज होणार आहे. एकवेळ अशीही आली की, ‘केदारनाथ’च्या रिलीजबद्दलही चाहत्यांना शंका वाटू लागली होती. सुरुवातीपासूनच ‘केदारनाथ’च्या मार्गात एक ना अनेक अडचणी येत होत्या. आधी हवामानामुळे या चित्रपटाचे शूटींग रखडले होते. नंतर या चित्रपटातील लीड हिरो सुशांत सिंग राजपूत याच्या मूड स्विंगमुळे चित्रपटाचे शूटींग लांबल्याची चर्चा झाली होती. यापश्चात ‘केदारनाथ’मधील महाप्रलयाचा सीन मुंबईत रिक्रिएट करण्याचा निर्णय झाल्याने शूटींग लांबले होते आणि ऐनवेळी निर्माता  आणि दिग्दर्शकामधील वादामुळे या सिनेमाचे शूटींग थांबले होते. तिकडे डेब्यू सिनेमा असा रखडल्याने साराची चिंताही मात्र वाढली होती. केवळ साराचं नाही तर तिचे डॅड सैफ अली खान आणि आई अमृता सिंह हे सुद्धा टेन्शनमध्ये आले होते. पण कालांतराने अभिषेक कपूर व निर्माता प्रेरणा अरोरा यांच्यातील मतभेद निवळला आणि ‘केदारनाथ’चा मार्ग मोकळा झाला. आता तर ‘केदारनाथ’चे शूटींगही संपले. होय, काल या चित्रपटाची रॅप अप पार्टी आयोजित केली गेली होती. या पार्टीत सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान दोघेही प्रचंड आनंदी दिसले.


 

‘केदारनाथ’मध्ये सारा अली खान  सुशांत सिंग राजपूतसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे.

 

 

Web Title: sara ali khan and sushant singh rajput at the kedarnath wrap up party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.