Good news for Sarah Ali Khan! 'Kedarnath' dispute ends! | ​सारा अली खानसाठी आनंदाची बातमी! ‘केदारनाथ’चा वाद निवळला!!

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचा डेब्यू सिनेमा ‘केदारनाथ’कडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘केदारनाथ’च्या मार्गातील अडचणी दूर होऊन या चित्रपटाच्या शूटींगचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाच्या वादात सापडला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि प्रॉडक्शन हाऊस KriArj Entertainmentदरम्यान रिलीज डेटवरून मतभेद निर्माण झाले होते. यामुळे चित्रपटाचे शूटींग अर्ध्यात रोखण्यात आले होते. साहजिकच, डेब्यू सिनेमा असा रखडल्याने साराची चिंता मात्र वाढली होती. केवळ साराचं नाही तर तिचे डॅड सैफ अली खान आणि आई अमृता सिंह हे सुद्धा टेन्शनमध्ये आले होते. पण आता अभिषेक कपूर व  निर्माता प्रेरणा अरोरा यांच्यातील मतभेद निवळल्याची खबर आहे.
तसे तर सुरुवातीपासूनच ‘केदारनाथ’च्या मार्गात एक ना अनेक अडचणी येत आहेत. आधी हवामानामुळे या चित्रपटाचे शूटींग रखडले होते. नंतर या चित्रपटातील लीड हिरो सुशांत सिंग राजपूत याच्या   मूड स्विंगमुळे चित्रपटाचे शूटींग लांबल्याची चर्चा झाली होती. यापश्चात ‘केदारनाथ’मधील महाप्रलयाचा सीन मुंबईत रिक्रिएट करण्याचा निर्णय झाल्याने शूटींग लांबले होते आणि ऐनवेळी निर्माता आणि दिग्दर्शकामधील वादामुळे या सिनेमाचे शूटींग थांबले होते.  

ALSO READ : ‘केदारनाथ’ रखडल्याने सैरभैर झाली सारा अली खान! आता ‘सिम्बा’चा आधार!!

‘केदारनाथ’मध्ये सारा अली खान  सुशांत सिंग राजपूतसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे.
Web Title: Good news for Sarah Ali Khan! 'Kedarnath' dispute ends!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.