अक्षय कुमारने घेतली PMची मुलाखत! सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 10:31 AM2019-04-24T10:31:15+5:302019-04-24T10:32:27+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘नॉन पॉलिटिकल’ मुलाखत घेण्याची संधी अक्षयला मिळाली. याचा टीजर व्हिडीओ अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. अक्षयने हा व्हिडीओ शेअर करताच, सोशल मीडियावर मजेदार आणि एकापेक्षा एक भन्नाट अशा मीम्सचा पूर आला.

pm narendra modi interview akshay kumar troll social media funny memes | अक्षय कुमारने घेतली PMची मुलाखत! सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर!

अक्षय कुमारने घेतली PMची मुलाखत! सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर!

googlenewsNext
ठळक मुद्देमम्मी, मेरे से कोई इंटरव्ह्यू क्यों नहीं करता है, असे वाक्य राहुल गांधींच्या तोंडी घालून युजर्सनी आपल्या भन्नाट कल्पनाशक्तीचे दर्शन घडवले.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्याकडे चित्रपटांची कमतरता नाही. पण सतत नवनव्या गोष्टी करण्यासाठी धडपडत असलेल्या अक्कीने यावेळी चांगलीच अनोखी संधी साधली. होय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘नॉन पॉलिटिकल’ मुलाखत घेण्याची संधी अक्षयला मिळाली. याचा टीजर व्हिडीओ अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘संपूर्ण देश निवडणूक आणि राजकारण याबद्दल बोलत असताना, हा थोडा ब्रेक़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्णपणे नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू घेण्याचे भाग्य मला लाभले...,’ असे अक्षयने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले.




अक्षयने हा व्हिडीओ शेअर करताच, सोशल मीडियावर मजेदार आणि एकापेक्षा एक भन्नाट अशा मीम्सचा पूर आला. युजर्सनी हे मीम्स शेअर करत अक्षय कुमार, नरेंद्र मोदी शिवाय राहुल गांधी व अरविंद केजरीवाल अशा सगळ्यांची मजा घेतली.


मम्मी, मेरे से कोई इंटरव्ह्यू क्यों नहीं करता है, असे वाक्य राहुल गांधींच्या तोंडी घालून युजर्सनी आपल्या भन्नाट कल्पनाशक्तीचे दर्शन घडवले. एका युजरने अक्षयची टर उडवली.

अक्षय, ही मुलाखत घेताना तू पत्नी टिष्ट्वंकलला सोबत घ्यायला हवे होते. कमीत कमी तिने खरे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले असते. तुझ्यासारखे जोक्स ऐकवले नसते, असा एका युजरने लिहिले. एका युजरने तर यानिमित्ताने अख्ख्या बॉलिवूडला लक्ष्य करत, बॉलिवूडला ‘दलालीवूड’ असे नवे नाव दिले.


एकंदर काय तर या मीम्सनी मुलाखतीपेक्षाही अधिक मनोरंजन केले. या फनी मीम्सवर एक नजर...



 



 



 



 



 

Web Title: pm narendra modi interview akshay kumar troll social media funny memes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.