दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची रिल पत्नी बनण्यास दिला नकार, कारण ऐकून चाहते होतील नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 04:35 PM2019-01-08T16:35:58+5:302019-01-08T16:41:52+5:30

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण रिल लाईफमध्ये पती पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने रिल लाईफमध्ये पत्नी बनण्यास नकार दिला आहे.

Deepika Padukone refuses to become Ranvir Singh's wife, because the fans will be angry | दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची रिल पत्नी बनण्यास दिला नकार, कारण ऐकून चाहते होतील नाराज

दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची रिल पत्नी बनण्यास दिला नकार, कारण ऐकून चाहते होतील नाराज

googlenewsNext
ठळक मुद्देरणवीर सिंग दिसणार कपिल देवच्या भूमिकेतदीपिकाला कपिल देवच्या पत्नीच्या भूमिकेसाठी आले विचारण्यात

खऱ्या आयुष्यात पती पत्नी असलेले दीपवीर म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण रिल लाईफमध्ये पती पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने रिल लाईफमध्ये पत्नी बनण्यास नकार दिला आहे. दीपिका पादुकोणरणवीर सिंग नुकतेच श्रीलंकेला हनीमूनवरून परतले आहेत.

श्रीलंकेवरून मुंबईत दाखल होताच रणवीर चित्रपटगृहात पोहचला. त्याचा सिनेमागृहात धुमाकुळ घालणारा चित्रपट 'सिम्बा'ची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करताना दिसला. यावेळी रणवीरने चेहऱ्यावर मास्क घातला होता.

तर दुसरीकडे दीपिका पादुकोणने आल्यानंतर तिच आगामी सिनेमा 'छपाक'चे काम सुरू केले. दीपिकाने सिनेमातील निगडीत व्यक्तींसोबत बैठक केली व या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रोस्थेटिक मेकअपची करण्याची गरज आहे की नाही, यावर सल्ले घेतले. 'छपाक' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

याच दरम्यान रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३'साठी दीपिका पादुकोणला देखील विचारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. निर्मात्यांनी या चित्रपटात दीपिका कपिल देवची पत्नी रोमीची भूमिका करण्यासाठी विचारले व निर्मात्यांच्या नुसार दीपिका हे काम एका आठवड्यात पूर्ण करू शकते. मात्र दीपिका पादुकोणच्या जवळच्या सूत्रांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, सध्या दीपिकाची बॉक्स ऑफिसवर असलेल्या ब्रॅण्ड व्हॅल्यूनुसार ती स्पेशल अपियरन्स करू शकणार नाही.

दीपिकाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून लक्ष्मी अग्रवालवरील बायोपिक छपाकच्या आधी कपिल देवचा बायोपिक '८३'मध्ये दिसून तिला छपाकबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता कमी करायची नाही. रणवीरनेदेखील '८३'च्या निर्मात्यांना दीपिकावर दबाव आणू नका असे सांगितले. आता दीपिका याबाबत काय निर्णय घेते, याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Deepika Padukone refuses to become Ranvir Singh's wife, because the fans will be angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.