रणवीर सिंगचं लक्झरी कार कलेक्शन, गाड्यांची किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 02:16 PM2018-07-28T14:16:33+5:302018-07-28T15:54:09+5:30

रणवीर सिंगला कपड्यांसोबत कार्सचीही आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सचं कलेक्शन आहे. चला जाणून घेऊया रणवीरकडे कोणत्या कार्स आहेत. 

Bollywood actor Ranveer Singh cars collection | रणवीर सिंगचं लक्झरी कार कलेक्शन, गाड्यांची किंमत वाचून व्हाल थक्क!

रणवीर सिंगचं लक्झरी कार कलेक्शन, गाड्यांची किंमत वाचून व्हाल थक्क!

googlenewsNext

अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या अफलातून अदाकारीसाठी चांगलाच लोकप्रिय आहे. त्यासोबतच तो त्याच्या बिनधास्त अंदाजासाठी आणि ड्रेसिंग स्टाइलसाठीही ओळखला जातो. त्याची ही आगळीवेगळी स्टाइल त्याचे चाहतेही फॉलो करतात. रणवीर सिंगला कपड्यांसोबत कार्सचीही आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सचं कलेक्शन आहे. चला जाणून घेऊया रणवीरकडे कोणत्या कार्स आहेत. 

टोयोटा लॅंड क्रूजर प्राडो 

86 लाख रुपये किंमत असलेली टोयोटा लॅंड क्रूजर ही कार रणवीर फार चालवत नाही. पण ही कार त्याच्या कलेक्शनमध्ये आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्याने ही कार खरेदी केली होती. 

ऑडी क्यू 5

रणवीरकडे असलेल्या एकापेक्षा एक आलिशान कार कलेक्शनमध्ये  ऑडी क्यू 5 या कारचाही समावेश आहे. या कारची किंमत 55 लाख रुपये आहे. 

मारुति सीयाज

(Image Credit: si.wsj.net)

रणवीर सिंगकडे मारूतिची सीयाज ही कार सुद्धा आहे. तो या कारचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर होता. त्यामुळे त्याला ही कार गिफ्ट मिळाली होती. 

रेंज रोव्हर वॉग

(Image Credit: www.ibtimes.co.in)

ही शानदार आणि आलिशान कार अनेक बॉलिवूड कलाकारांची आवडती कार आहे. रणवीरला सुद्धा ही कार पसंत असून या कारची किंमत 1.60 कोटी रुपये आहे.  

एस्टन मार्टिन रॅपिड एस

रणवीरची त्याचा कलेक्शनमधील ही सर्वात फेवरेट कार आहे. त्याने त्याच्या वाढदिवसाला स्वत:ला ही 4 कोटी रुपयांची कार गिफ्ट केली होती. 

मर्सिडीज इ क्सास

(Image Credit: www.nationwidevehiclecontracts.co.uk)

रणवीर दररोज कुठे येण्या-जाण्यासाठी  मर्सिडीज इ क्सास या कारचा वापर करतो. 55 लाख रुपये किंमतीची ही कार फार आरामदायक आहे. 

मर्सिडीज बेंज जीएल क्लास

(Image Credit: laautostore.net)

ही कारही रणवीरच्या आवडत्या कारपैकी एक आहे. या कारची किंमत 80 लाख रुपये आहे.  

जगुआर एक्सजेएल

(Image Credit: www.cartoq.com)

रणवीर कपूर ही कार अनेकदा वापरतो. कुठेही पार्टिला जाताना तो ही कार वापरतो. या कारची किंमत 1 कोटी रुपये इतकी आहे.  
 

Web Title: Bollywood actor Ranveer Singh cars collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.