अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' चित्रपट अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 08:05 PM2018-11-22T20:05:22+5:302018-11-22T20:06:16+5:30

अक्षय कुमार, तापसी पन्नू आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीलाच या चित्रपटाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

Akshay Kumar's film Mission Mangal has in trouble | अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' चित्रपट अडचणीत

अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' चित्रपट अडचणीत

googlenewsNext
ठळक मुद्दे राधा भारद्वाज यांनी केला कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप राधा भारद्वाज यांनी मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव

अक्षय कुमार, तापसी पन्नू आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीलाच या चित्रपटाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. सू्त्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शिका राधा भारद्वाज यांनी 'मिशन मंगल' सिनेमाचे निर्माते अतुल कसबेकर यांच्यावर कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
यासंदर्भात राधा भारद्वाज यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाचे चित्रीकरण आणि प्रदर्शन थांबवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. २०१६ मध्ये निर्माते अतुल कसबेकर यांना मी लिहिलेली एक कथा सांगितली होती. यात मी मंगल मिशनमध्ये महिला इंजिनिअर यांच्यावर आधारित कथा लिहिली होती. आता अतुल कसबेकर त्याच कथेवर चित्रपट बनवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 'मिशन मंगल' चित्रपट भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित असून मंगळयान मोहिमेत महिलांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू झळकणार आहेत. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, 'मिशन मंगल' चित्रपटात सोनाक्षी गेस्ट अपियरेन्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी फक्त दहा ते पंधरा मिनिटांसाठी दिसणार आहे. तिच्या भूमिकेबद्दल सविस्तर समजू शकलेले नाही. असे बोलले जात आहे की सोनाक्षी या चित्रपटात खगोल शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे जी मिशनचा हिस्सा असणार आहे.  

Web Title: Akshay Kumar's film Mission Mangal has in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.