अक्षय कुमार असा बनला खलनायक '२.०' चित्रपटासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 18:21 IST2018-09-20T18:16:28+5:302018-09-20T18:21:24+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट '२.०'चा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे

अक्षय कुमार असा बनला खलनायक '२.०' चित्रपटासाठी
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट '२.०'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अॅक्शनने परिपूर्ण असलेला टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे. या व्हिडिओत अक्षय कुमार व रजनीकांत यांचा या सिनेमातील लूक कसा तयार केला जातो आहे, हे दाखवले आहे. खरेतर हा मेकिंग व्हिडिओ प्रोडक्शन हाऊसने एक वर्षापूर्वीच रिलीज केले होते. मात्र सध्या हा व्हिडिओ युट्यूबवर खूप लोक पाहत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ ट्रेंडिंग झाला आहे.
'२.०' या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात अक्षय नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच तो खलनायकाच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामूळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. सोशल मीडियावर अक्षयचा एक व्हिडिओ ट्रेण्ड होत आहे. या व्हिडिओत अक्षयने या चित्रपटासाठी कशाप्रकारे मेहनत घेतली ते दिसत आहे. २.० मध्ये विलन साकारण्यासाठी त्याच्यावर कशाप्रकारे मेकअप करण्यात आले, हेही या व्हिडिओत दिसत आहे.
या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच, अवघ्या काही तासांतच त्याला ३२ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले होते. या चित्रपटाने केवळ २४ तासांत हा आकडा पार केल्याची माहिती स्वत: चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. '२.०' चित्रपटातील अक्षय कुमार व रजनीकांत यांचा लूक पाहून त्यांचे चाहते या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.