कॅन्सरसोबतची लढाई सुरु, सोनाली बेंद्रेने शेअर केला हेअरकटचा इमोशनल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 16:54 IST2018-07-10T16:48:31+5:302018-07-10T16:54:34+5:30
सध्या सोनाली ही न्ययॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती.

कॅन्सरसोबतची लढाई सुरु, सोनाली बेंद्रेने शेअर केला हेअरकटचा इमोशनल व्हिडीओ
मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर केस कापतानाचा इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबतच एक पोस्टही लिहिली आहे. सध्या सोनाली ही न्ययॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती.
सोनालीला झालेल्या कॅन्सरची बातमी काही वेळातच वाऱ्यासारखी पसरली आणि तिच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडकरांना एकच धक्का बसला. त्यानंतर ती लवकर बरी व्हावी यासाठी सर्वांना प्रार्थना केली. अशातच आता तिने उपचाराच्या प्रकियेसाठी केस कापतानाचा व्हिडीओ शेअर केलाय.
🤞🌞 #SwitchOnTheSunshine (2/2) pic.twitter.com/Lw6wum2xaf
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 10, 2018
🤞🌞 #SwitchOnTheSunshine (1/2) pic.twitter.com/zz7SwJXlhz
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 10, 2018
सोनालीने लिहिले की, गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेले प्रेम पाहून मी भावूक झाले आहे. मी त्या लोकांची खूप आभारी आहे ज्यांनी कॅन्सरशी लढा देण्याचे त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर केलेत. त्यांनी शेअर केलेल्या गोष्टींमुळे मला शक्ती आणि हिंमत मिळत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मला कळाले की, मी एकटी नाहीये.
'मी रोज नव्या आव्हानांना तोंड देत आहे, या आव्हानांसोबत मी एक-एक करून लढा देत आहे. #SwitchOnTheSunshine- ही माझा मला होत असलेल्या त्रासाशी लढण्याची पद्धत आहे'.