आईला शिवीगाळ केल्याचा राग, तरुणाची दगडाने ठेचून हत्या; दोन आरोपींना अटक

By रवींद्र चांदेकर | Updated: September 8, 2022 17:58 IST2022-09-08T17:42:10+5:302022-09-08T17:58:23+5:30

हत्या करून दोन्ही आरोपी फरार होण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहितीवरून दोघांना बसस्थानकातून अटक केली.

two accused arrested for killing a man by crushing him with a stone | आईला शिवीगाळ केल्याचा राग, तरुणाची दगडाने ठेचून हत्या; दोन आरोपींना अटक

आईला शिवीगाळ केल्याचा राग, तरुणाची दगडाने ठेचून हत्या; दोन आरोपींना अटक

यवतमाळ : आईला शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवून दोघांनी एकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. ही घटना गुरुवारी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुणवंतराव देशमुख परिसर कवडीपूरमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अजय शालिकराव येवले (४०) रा. ओमनगर, असे मृताचे नाव आहे. गजानन काळे आणि शेख समीर शेख सलीम दोन्ही रा. श्रीरामपूर, अशी आरोपींची नावे आहे. अजय येवले याने आरोपी गजाननच्या आईला शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात ठेवून बुधवारी रात्री १ ते १.३० वाजताच्या सुमारास गजानन व त्याचा मित्र शेख समीर शेख सलीम यांनी दगडाने ठेचून अजय येवले यांची हत्या केली. हत्या करून दोन्ही आरोपी फरार होण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहितीवरून दोघांना बसस्थानकातून अटक केली.

घटनास्थळी अजय रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस आणि वसंतनगर पोलीस घटनास्थळी धडकले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. नंतर अवघ्या काही तासातच पडून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपी गजानन काळे आणि शेख समीर शेख सलीम यांना अटक करण्यात यश मिळविले. ही कारवाई वसंतनगर पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे हेडकॉन्स्टेबल अशोक चव्हाण, मुन्ना आडे, कुणाल मुंडोकार, संजय पवार, सतीश शिंदे, चालक अनंता तारमेकवाड यांनी पार पाडली.

Web Title: two accused arrested for killing a man by crushing him with a stone