एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटातून मुलीची आत्महत्या; आरोपी युवक पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 15:03 IST2022-07-23T14:58:00+5:302022-07-23T15:03:10+5:30
युवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रीतीने पूस नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केली.

एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटातून मुलीची आत्महत्या; आरोपी युवक पोलिसांच्या ताब्यात
पुसद (यवतमाळ) : एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी तगादा लावल्याने एका अल्पवयीन युवतीने पूस नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
प्रीती अजय जगझाप (१५, रा. वलबाबा वॉर्ड, पुसद) असे मृत अल्पवयीन युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत प्रीती हिच्यावर तुकाराम बापू वॉर्डातील रहिवासी शुभम राजू घड्याळे (२१) याचे एकतर्फी प्रेम हाेतेे. त्यातूनच तो प्रीतीच्या मागे लग्नासाठी तगादा लावत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी प्रीतीने दुपारी २ वाजताच्या सुमारास पूस नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केली.
या घटनेनंतर लोकांनी पुलावर मोठी गर्दी केली होती. लोकांच्या मदतीने पोलिसांनी प्रीतीचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी मृतक प्रीतीची बहीण शीतल अजय जगझाप (२७, रा. नवलबाबा वॉर्ड) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी शुभम राजू घड्याळे याच्याविरुद्ध भादंवि ३०६ कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.