Next

अमेठीतील नेत्याची हत्या करणाऱ्यांना शिक्षा देणार; स्मृती इराणींनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:19 AM2019-05-27T09:19:18+5:302019-05-27T09:19:41+5:30

अमेठीमधील बरौलिया गावातील माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत ...

अमेठीमधील बरौलिया गावातील माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपा नेत्या स्मृती इराणी यांचे ते निकटवर्तीय होते. तसेच त्यांनी सरपंचपद भूषवलेल्या बरौलिया गावाला मनोहर पर्रिकर यांनी दत्तक घेतले होते.