Voters consider the development of the country - Bhavna Gavali | मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी
मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी

- नंदकिशोर नारे 
वाशिम - वाशिम लोकसभा व यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय प्राप्त करणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या विजयाबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद
प्रश्न : आपल्याला जनतेनी निवडून दिले याबद्दल काय सांगाल ?
उत्तर : हा माझा विजय नसून जनतेचा विजय आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी देशाचा विचार करुन मतदान केले. जनता हुशार, चाणाक्ष झालेली आहे, कोणाला सत्तेवर बसवायचे व कोणाला नाही चांगले अवगत आहे. देशाचा विचार करीत जनतेनी मतदान केले.
आपल्या विजयाचे शिल्पकार कोण ?
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून मतदान केले. माझ्या विजयाचे शिल्पकार संपूर्ण जनता जनार्दनासह माझ्यासाठी रात्रंदिवस झटलेले माझे भाऊ -बहिणी व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते होत.
या निवडणुकीत आपणास सर्वांचेच सहकार्य लाभले का?
माझ्या विजयावरुन मला असे वाटत नाही की मला कोणाचे सहकार्य लाभले नाही . सर्वांनी मेहनत केल्याने व मतदारांनी सुध्दा विचारपूर्वक निर्णय घेतल्याने हा विजय झाला.निवडणूक म्हटली की थोडाफार विरोध चालतच असतो तो कायमस्वरुपी नसतो.
मतदारसंघाच्या विकासाबाबत काय सांगाल?
माझ्या मतदारसंघातील जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीच तडा न जावू देता विकासास कटीबध्द आहे.

Web Title: Voters consider the development of the country - Bhavna Gavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.