निवडणुकीच्या प्रचाराचा पॅटर्न बदलला; सोशल मीडियाद्वारे काम, सभांचे व्हिडीओ पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:30 IST2025-12-30T08:30:27+5:302025-12-30T08:30:27+5:30
उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेता अनेकांनी आपापली कामे यातून समोर आणणे सुरू केले आहे.

निवडणुकीच्या प्रचाराचा पॅटर्न बदलला; सोशल मीडियाद्वारे काम, सभांचे व्हिडीओ पोस्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: वसई विरार मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असून लवकरच प्रचाराला सुरुवात होईल. मात्र यंदा प्रचार सभा, चौक सभा आणि घरोघरी जाऊन पत्रके वाटण्याची इच्छुक उमेदवार वाट पाहत राहिलेले नाहीत. बदलत्या काळानुसार प्रचाराचा पॅटर्नही बदलत असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यापूर्वीच प्रचार सुरू केला आहे.
उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेता अनेकांनी आपापली कामे यातून समोर आणणे सुरू केले आहे.
सोशल मीडियाद्वारे काम, सभांचे व्हिडीओ पोस्ट
पूर्वी प्रचार म्हटला की, सभा, चौकसभा, रॅली काढून पत्रकांद्वारे आपल्या कामांची आणि नियोजित विकास कामांची त्यातून माहिती दिली जायची. मात्र आता प्रत्येक मतदाराच्या हातात असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून उमेदवार पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या कामांसह आपल्या सभा, प्रभागातील भेटीगाठींचे व्हिडीओ, रिल्स सोशल मीडियाद्वारे पोस्ट करून मतदाराला माहिती दिली जात आहे.
काळानुसार बदलत असलेल्या या निवडणूक प्रचाराचा 3 पॅटर्न मतदारांच्याही सोयीचा ठरत आहे. सध्याच्या परिस्थितीत एका प्रभागाचा विचार केला तर मतदारांची संख्या सरासरी ३० ते ४५ हजारांच्या आसपास असते. उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग आणि प्रचारासाठी मिळणारा कमी वेळ लक्षात घेता, प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष भेट घेणे उमेदवारांना शक्य होत नाही. यावर पर्याय म्हणून सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे.