वसई-विरारमध्ये भाजपाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला, बविआत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 09:13 IST2026-01-01T09:12:55+5:302026-01-01T09:13:52+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात घडलेले व भाजप पक्षासाठी निष्ठावंत राहून अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे.

वसई-विरारमध्ये भाजपाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला, बविआत प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर धुरी यांनी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपला राम राम करत हितेंद्र ठाकूर यांच्या बविआत केला. भाजपसाठी प्रवेश त्यामुळे हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. धुरी यांनी वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी बविआमधून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची भाजपमधील नाराजी दिसून आली आहे.
भाजपमध्ये असलेले शेखर धुरी यांनी नवघर ग्रामपंचायत काळात सरपंच पद भूषवले होते. तसेच नगरपरिषदेत नगरसेवक, शिक्षण सभापती पदाची धुरा सांभाळली होती. उत्तम लेखक, तसेच साहित्यिकदेखील आहेत. आरएसएसमध्ये घडलेले व भाजप पक्षासाठी निष्ठावंत राहून अनेक वर्षे त्यांनी काम केले. मात्र, वसई विरार महापालिका निवडणुकीत उभे राहण्याची त्यांची इच्छा असताना त्यांना तिकीट डावलण्यात आले. त्यामुळे शेखर धुरी यांनी बविआचा झेंडा हाती घेतला.