उमेदवाराने १२ गुन्हे लपविल्याचा आरोप; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:18 IST2026-01-08T09:18:02+5:302026-01-08T09:18:02+5:30
याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.

उमेदवाराने १२ गुन्हे लपविल्याचा आरोप; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
वसई-विरार : प्रभाग १६चे बविआ उमेदवार धनंजय गावडे यांनी गुन्हेगारी स्वरूपाची माहिती शपथपत्रात लपविली आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी भाजपचे उमेदवार जयप्रकाश रामसागर सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.
गावडे यांनी प्रतिज्ञापत्रात १० गुन्ह्यांचा उल्लेख केला असून, प्रत्यक्षात १६ गुन्हे दाखल असून, त्यातील १२ प्रकरणे प्रलंबित असल्याचा दावा याचिकाकर्ते सिंह यांनी याचिकेत केला आहे. या प्रकाराबाबत न्यायालयाने हस्तक्षेप करावा, तसेच संबंधित उमेदवारावर खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे.