“वसई-विरारमध्ये युतीधर्माला हरताळ”; शिंदेसेनेच्या नेत्यांची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:15 IST2026-01-08T09:15:49+5:302026-01-08T09:15:49+5:30
हा निर्णय सर्व घटक पक्षांच्या संमतीने घेतला होता.

“वसई-विरारमध्ये युतीधर्माला हरताळ”; शिंदेसेनेच्या नेत्यांची भाजपावर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, वसई-विरार : बोईसर विधानसभा मतदारसंघात भाजपने सात अतिरिक्त एबी फॉर्म वितरित केल्याचा आरोप शिंदेसेनेचे आ. विलास तरे यांनी केला. हा प्रकार युतीधर्मात संभ्रम निर्माण करणारा आहे, असेही ते म्हणाले.
भाजप, शिंदेसेना, श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेच्या माध्यमातून महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असताना, त्यानुसार भाजपला ८८ आणि शिंदेसेनेला २७ जागा दिल्या होत्या. हा निर्णय सर्व घटक पक्षांच्या संमतीने घेतला होता. मात्र, त्याला हरताळ फासत भाजपच्या काही नेत्यांनी स्वार्थापोटी ७ अतिरिक्त एबी फॉर्म दिले, हा प्रकार न पटणारा आहे, असेही तरे म्हणाले.