आचारसंहितेच्या अंमलासाठी आयोगाचे अ‍ॅप वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 04:17 AM2019-04-03T04:17:07+5:302019-04-03T04:17:22+5:30

जिल्हाधिकारी नारनवरे यांचे जनतेला आवाहन :लोकसभा निवडणुकीची प्रक्रि या सुरू

Use the commission's apparatus to implement the Code of Conduct | आचारसंहितेच्या अंमलासाठी आयोगाचे अ‍ॅप वापरा

आचारसंहितेच्या अंमलासाठी आयोगाचे अ‍ॅप वापरा

Next

पाालघर : पालघर (अज) लोकसभा मतदारसंघाकरीता चौथ्या टप्प्यामध्ये २९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून या कालावधीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी देखील आयोगाच्या विविध अ‍ॅपचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

पालघर मतदारसंघासाठी आज अधिसूचना जारी झाली असून प्रक्रि ये ेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. नारनवरे बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नवनाथ जरे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, या निवडणुकीत निवडणूक आयोगामार्फत सीव्हिजिल, समाधान, १९५० हा टोल फ्री क्रमांक अशा विविध अ‍ॅप आणि सुविधांचा वापर करण्यात येत आहे. याद्वारे पालघर मतदारसंघात आतापर्यंत २५४ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. मतदानासाठी २९ एप्रिल रोजी सर्वांना सुटी जाहीर करण्यात आली असून जेथे अत्यावश्यक सेवा आहे तेथे दोन तासांची भरपगारी सुटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शस्त्रास्त्रे जमा करण्याबाबत संबंधितांची बैठक घेण्यात आली त्यानंतर आतापर्यंत १ हजार १२५ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. तर आवश्यक तेथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. मतदार संघात सार्वजनिक ठिकाणी असलेली ३ हजार ६८२ तर खाजगी ठिकाणी असलेली ७८६ पोस्टर्स आणि बॅनर्स हटविण्यात आली आहेत. व्हीडिओ पथक, भरारी पथक आदींच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. आचारसंहितेचे पालन करणे हे सर्वांसाठी बंधनकारक असून त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाकरीता आवश्यक सर्व कर्मचारी वर्गाच्या नेमणुका करण्यात आल्या असून सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी,कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये यापूर्वी 2120 मतदान केंद्रे समाविष्ट होती. निरंतर प्रक्रि येमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांनुसार मतदार संख्येमध्ये वाढ झाली असल्याने ज्या मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या 1400 पेक्षा अधिक होत आहे अशा मतदान केंद्रांचे सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्याच्या आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये 57 मतदान केंद्रे वाढली असून, एकूण 2177 मतदान केंद्रे झाली आहेत. पालघर जिल्ह्याकरीता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगळूरू या कंपनीकडून प्राप्त झालेल्या ट3 एश्ट२ व श्श्ढअळ२ चा वापर करण्यात येणार आहे. तसेच एश्ट व श्श्ढअळ आज सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये रवाना करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 682 इतक्या दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांकरीता पीडब्ल्यूडी सुरु केले आहे.

उमेदवारांना अर्ज भरतांना घ्यावी लागेल ही काळजी
उमेदवाराने आपले अर्ज बिनचूक भरावेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशासनामार्फत सहकार्य केले जाईल, असे डॉ.नारनवरे यांनी सांगितले. ९ एप्रिल, 2019 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवाराने स्वत:हून त्याच्या गुन्हेगारी पाशर््वभूमीबाबत वर्तमानपत्रामध्ये 3 वेळा माहिती प्रसिद्ध करावयाची आहे. अर्ज भरताना उमेदवाराने शपथपत्रामध्ये गुन्ह्यांबाबत, मालमत्ता देणी, शैक्षणिक अर्हता, सोशल मिडीयावरील माहिती, सोशल मिडीयावरील अकाऊंट्स याची माहिती भरणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवाराने बँक खात्याचा तपशिल सादर करु न त्या बँक खात्यातूनच निवडणूक विषयक खर्च करावा.

Web Title: Use the commission's apparatus to implement the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.