धक्कादायक! घरी परतण्यास उशीर; आई-आजीने मुलीला दिले चटके; दोघींविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:15 IST2025-12-05T16:15:09+5:302025-12-05T16:15:42+5:30
१४ वर्षांची मुलगी विरार पूर्व परिसरात राहते. १ डिसेंबरला ती आपल्या मित्रासोबत राजोडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. बरचा वेळ झाला तरी ती घरी परतली नाही.

धक्कादायक! घरी परतण्यास उशीर; आई-आजीने मुलीला दिले चटके; दोघींविरोधात गुन्हा दाखल
नालासोपारा : मित्रासोबत फिरायला गेल्याने अल्पवयीन मुलीला तिच्या आई व आजीने चाकू गरम करून चटके दिले. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, विरार पोलिसांनी बुधवारी आई, आजीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१४ वर्षांची मुलगी विरार पूर्व परिसरात राहते. १ डिसेंबरला ती आपल्या मित्रासोबत राजोडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. बरचा वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे तिला घरी येण्यासाठी उशीर झाला. मुलगी घरी परतल्यावर आई व आजीने तिला जाब विचारला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दोघींनी चाकू गरम करून तिच्या दोन्ही हाताला व डाव्या पायाला चटके दिले. या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली.
आई व आजीने केलेल्या मारहाणीबाबत मुलीने विरार पोलिस ठाण्यात तक्रार केली. मुलीच्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी मुलीची गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेनंतर विरार परिसरात चर्चेला उधाण आले. कुणी टीका केली तरी कुणी मुलीचे काैतुक केले.