चोरी, घरफोडी करणाऱ्या चौकडीला अटक,वालीव पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 17:23 IST2023-12-29T17:23:22+5:302023-12-29T17:23:58+5:30
११ गुन्ह्यांची केली उकल.

चोरी, घरफोडी करणाऱ्या चौकडीला अटक,वालीव पोलिसांना यश
नालासोपारा (मंगेश कराळे) :- चोरी, घरफोडी करणाऱ्या चार आरोपींच्या टोळीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. या आरोपीकडून ११ गुन्ह्यांची उकल करून गुन्ह्यातील काही मुद्देमालही हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.
गोखीवरे, फादरवाडी येथून २१ डिसेंबरला रात्री टेंपोतून कॅटरसचेे सामान चोरी करण्यात आले होते. वालीव पोलिसांनी तक्रार आल्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयांचा तपास करुन आरोपी कल्पेश किसन शिंदे (२३), शमशुददीन ऊर्फ भाटी इकबाल खान (१८), अजय चितांमण आंधेर (२२) आणि राजाप्रसाद राजपत यादव (२०) या चौघांना ताब्यात घेवुन तपास केल्यावर सदर गुन्हातील सहभाग निष्पन्न झाल्याले अटक करण्यात आली. अटक आरोपीकडे तपास केला असता त्यांनी वालीव पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील एकुण ११ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयातील जबरी चोरी केलेले मोबाईल, दागिने, रोख रक्कम व इतर मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा १ लाख ५५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सुनील चव्हाण, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी पार पाडली आहे.