Vidhan sabha 2019 : विक्रमगडमध्ये भाजपकडून हेमंत सवरा यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 23:51 IST2019-10-01T23:50:00+5:302019-10-01T23:51:49+5:30
माजी मंत्री विष्णू सवरा यांच्या आजारपणामुळे या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेतून भाजपचा उमेदवार कोण असेल याची उत्कंठा मंगळवारी संपली.

Vidhan sabha 2019 : विक्रमगडमध्ये भाजपकडून हेमंत सवरा यांना उमेदवारी
जव्हार : माजी मंत्री विष्णू सवरा यांच्या आजारपणामुळे या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेतून भाजपचा उमेदवार कोण असेल याची उत्कंठा मंगळवारी संपली. विष्णू सवरा यांचे पूत्र हेमंत सवरा यांची उमेदवारी पक्षाने नक्की केल्याने आता या मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. येथे आता राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी सरळ लढत होणार आहे. याशिवाय सीपीएम, बविआ आणि काँग्रेसचाही पाठिंबा राष्टÑवादीला जाहीर झाल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून मतदारसंघासाठी सुनील भुसारा यांचे नाव जवळपास निश्चित होते. त्यांच्या विरोधात भाजपमधील कोण, हा प्रश्न कायम होता. हेमंत सवरा, सुरेखा थेतले आणि हरिशचंद्र भोये अशा तिघांच्या नावाची चर्चा होती. यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होत नव्हते. मात्र, भाजपने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर यामध्ये सवरा यांना उमेदवारी जाहीर केली.