coronavirus : अर्नाळामध्ये वृद्धाचा कोरोनाने मृत्यू; वसई तालुक्यातील कोरोनाचा 7 वा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 23:13 IST2020-04-23T23:12:06+5:302020-04-23T23:13:08+5:30

विरार अर्नाळा येथील या वृद्ध रूग्णाचा कोरोना ने बळी गेल्याने आता वसई तालुक्यातील हा 7 वा बळी आहे.

coronavirus: coronavirus death of an old man in Arnala; 7th victim of Corona in Vasai taluka | coronavirus : अर्नाळामध्ये वृद्धाचा कोरोनाने मृत्यू; वसई तालुक्यातील कोरोनाचा 7 वा बळी

coronavirus : अर्नाळामध्ये वृद्धाचा कोरोनाने मृत्यू; वसई तालुक्यातील कोरोनाचा 7 वा बळी

वसई - येथील वसई तालुक्यात कोरोनाच्या आकड्यांने गुरुवारी शंभरी पार केली असून हा वाढता आकडा चिंतेचा बनला असताना आता गुरुवारी दुपारी विरार च्या अर्नाळा मधील 66 वर्षीय वृध्द रूग्णाचा कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात मृत्य झाला असल्याची माहिती विरार आगाशी ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋग्वेद दुधाट यांनी लोकमत शी बोलताना दिली.

दरम्यान मागील काही दिवसांपासून विरार अर्नाळा तील 66 वर्षीय जेष्ठ नागरिक यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी अर्नाळा स्थित ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन तिथे उपचार सुरू होते
मात्र अलीकडेच त्यांना विरार गोकूळ टाऊन शिप स्थित येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र गुरुवारी दुपारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असता उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

विरार अर्नाळा येथील या वृद्ध रूग्णाचा कोरोना ने बळी गेल्याने आता वसई तालुक्यातील हा 7 वा बळी आहे.

Web Title: coronavirus: coronavirus death of an old man in Arnala; 7th victim of Corona in Vasai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.