धक्कादायक! बंदुकीचा निशाणा चुकला अन् झाली दुर्घटना; कुत्र्याला मारलेली गोळी लागली महिलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 18:51 IST2022-10-07T18:50:41+5:302022-10-07T18:51:18+5:30

नासासोपारा येथे भटक्या कुत्र्यावर झाडलेली गोळी सायकलवरून चाललेल्या महिलेला लागली. 

A woman riding a bicycle was hit by a bullet fired at a stray dog in Nalasopara  | धक्कादायक! बंदुकीचा निशाणा चुकला अन् झाली दुर्घटना; कुत्र्याला मारलेली गोळी लागली महिलेला

धक्कादायक! बंदुकीचा निशाणा चुकला अन् झाली दुर्घटना; कुत्र्याला मारलेली गोळी लागली महिलेला

(मंगेळ कराळे) 

नालासोपारा: भटक्या कुत्र्यावर एअर गनने झाडलेली गोळी घरकाम करून सायकलवरून घरी परतणाऱ्या ३८ वर्षीय महिलेच्या पायाला लागल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी गिरीजच्या बदामी स्टॉपजवळ घडली आहे. या घटनेत सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी बंगली हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास व चौकशी करत आहे.

गिरीजच्या बरमाळे तलाव याठिकाणी राहणाऱ्या सरिता भोईर (३८) या शुक्रवारी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घरकाम करून सायकलीवरून बदामी स्टॉप जवळून जात होत्या. माविको बंगल्याचे मालक मायकल कुटीन्हो यांच्या पाळीव कुत्र्याला भटका कुत्रा चावल्याने त्याला मारण्यासाठी त्यांच्या हातातील एअर गनने फायरिंग केली असता ती गोळी सरिता यांच्या उजव्या पायाच्या मांडीला लागून गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर सदर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. बंगली येथील कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमधून एमएलसी आल्यावर वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

भटक्या कुत्र्यावर झाडलेली गोळी महिलेच्या मांडीला लागून गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर बंगली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून ऑपरेशन होणार आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली. 


 

Web Title: A woman riding a bicycle was hit by a bullet fired at a stray dog in Nalasopara