मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीला उडवले; अपघातात तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 10:25 IST2023-11-03T10:25:01+5:302023-11-03T10:25:43+5:30

अग्रवाल नाक्याजवळ वसई-विरार मनपाच्या कचरा गाडीने झाला अपघात

A municipal garbage truck blew up a two-wheeler; The young man's body was cut into two pieces in the accident | मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीला उडवले; अपघातात तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे

मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीला उडवले; अपघातात तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: ३७ वर्षीय दुचाकीस्वाराला गुरुवारी दुपारी मनपाच्या कचरा गाडीने उडवले. या अपघातात दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच वालीव पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वालीव पोलिसांनी कचरा गाडीवरील आरोपी चालकाविरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. राजावली परिसरात राहणारे राजेश शंकर मोर (३७) हे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीने चिंचोटीवरून राजवली येथील घरी येत होते.

अग्रवाल नाक्याजवळ रेंज ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिरुपती इंडस्ट्रीच्या गेटसमोर वसई-विरार मनपाच्या कचरा गाडीवरील चालकाने ताब्यातील वाहन अविचाराने, हयगईने व वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालविल्यामुळे दुचाकीला जोरदार ठोकर मारली. या अपघातात राजेश यांच्या पोटाचा चेंदामेंदा होऊन शरीराचे दोन तुकडे झाले. तसेच, अतिरक्तस्राव झाल्याने घटनास्थळी मृत्यू झाला आहे.

Web Title: A municipal garbage truck blew up a two-wheeler; The young man's body was cut into two pieces in the accident