विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; विरारमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 19:52 IST2024-02-09T19:50:39+5:302024-02-09T19:52:40+5:30
विरारमधील विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; विरारमधील घटना
(मंगेश कराळे)
नालासोपारा: विरारमधील विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विरार पश्चिमेला असलेल्या विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून सुमित सरोज (१८) या तरुणाने उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना दुपारी ३ च्या सुमारास घडली.
या घटनेनंतर लगेचच जखमी तरुणाला संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तो बारावीत शिकत होता. मात्र, सुमितने हे पाऊल का उचलले याला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. तसेच हा पडला की त्याला ढकलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे सध्या सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे.