‘जॉब फ्राॅड’; तरुणीची १.३४ लाखांनी फसवणूक, भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 17:01 IST2023-03-23T17:00:46+5:302023-03-23T17:01:00+5:30
देवळी शहरातील घटना

‘जॉब फ्राॅड’; तरुणीची १.३४ लाखांनी फसवणूक, भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या असतानाच नोकरीचे आमिष देत तरुणीकडून चक्क १ लाख ३४ हजार २६५ रुपयांची रक्कम उकळून फसवणूक केल्याची घटना देवळी शहरात घडली. याप्रकरणी तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
देवळी शहरातील रहिवासी २४ वर्षीय तरुणीच्या ई-मेलवर जॉब देण्यासाठी माहिती आली होती. त्यानुसार तिने टाटा मोटर्स पिंपरी पुणे कंपनीच्या नावाने ई-मेलवरून अर्ज केला होता. त्यानंतर तरुणीची कंपनीत निवड झाली असे सांगून तिच्याकडून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून तब्बल १ लाख ३४ हजार रुपये खात्यात टाकण्यास सांगितले. मात्र, नोकरीबाबत कुणी काहीही सांगत नसल्याने तरुणीने मोबाईल क्रमांकावर फोन करून पैसे परत मागितले. मात्र, याबाबत कुणीही काही सांगत नसल्याने तरुणीला आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने तत्काळ याबाबतची तक्रार देवळी पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.