अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू, नांदगाव शेतशिवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 16:53 IST2022-07-09T16:34:44+5:302022-07-09T16:53:35+5:30

शेतशिवारात काम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला.

Woman dies after being electrocuted, | अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू, नांदगाव शेतशिवारातील घटना

अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू, नांदगाव शेतशिवारातील घटना

वर्धामोझरी (शे.) नजीकच्या नांदगाव (कानगाव) येथील महिलेचा शेतशिवारात  विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारला दुपारी  २:३० वाजताच्या सुमारास घडली.    

आज दुपारी अचानक मेघ गर्जनासह जोरदार पाऊस झाला. नांदगाव येथील  शेतशिवारात गीता गजानन मेश्राम (३५) ही महिला शेतात असतांना अचानक वीज कोसळली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस पाटील गजानन घोडे यांनी तत्काळ अल्लीपूर पोलीस ठाण्याला माहिती कळविली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  वृत्त लिहेपर्यंत पंचनामा कारवाई सुरू असल्याचे दिसून आले.

Web Title: Woman dies after being electrocuted,