जमीन संपादित केली पण ८ वर्षापासून शेतकऱ्यांना मोबदल्याचे पैसे मिळाले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:57 IST2025-03-05T17:55:33+5:302025-03-05T17:57:54+5:30

Wardha : कुटकीच्या शेतकऱ्यांची अडचण अजूनही कायम

The land was acquired but the farmers have not received the compensation for 8 years | जमीन संपादित केली पण ८ वर्षापासून शेतकऱ्यांना मोबदल्याचे पैसे मिळाले नाही

The land was acquired but the farmers have not received the compensation for 8 years

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ३५३ (१) (वाडी-आसोला-सेलडोह-पवनार) या मार्गाकरिता कुटकी येथील जमिनींचे संपादन करण्यात आले. आता हा मार्गही पूर्णत्वास गेला असून अद्यापही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. शेतकरी आठ वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असून तातडीने शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी अशोक झाडे यांच्यासह इतरही शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्याकडे केली आहे.


शेतकरी झिजविताहेत कार्यालयाचे उंबरठे
कुटकी येथील शेतकरी जमिनीचा मोबदला मिळावा, याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन मोबदला देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवून कार्यवाही सुरू केली होती.


मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाई झालीच नाही
हा प्रश्न नामदार नितीन गडकरी यांच्याकडे गेला होता. त्यांनी मोबदला देण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्या संर्भात प्रस्ताव सादर करून आता चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही त्यावर काही कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम आहे म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोबदला देण्याची मागणी केली आहे.

Web Title: The land was acquired but the farmers have not received the compensation for 8 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.