डमी पेमेंट ॲप्स वापरून स्मार्ट फसवणूक ; व्यापारी, दुकानदार राहा सावध !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 20:10 IST2025-07-02T20:08:57+5:302025-07-02T20:10:04+5:30
डमी ॲप्सचा सायबर हल्ला : डमी पेमेंटमुळे व्यापाऱ्यांची झोप उडाली!

Smart fraud using dummy payment apps; Traders, shopkeepers beware!
वर्धा : सोशल मीडियात लोकप्रिय पेमेंट ॲप्सच्या बनावट डमी ॲप्सचा अलिकडे मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. या माध्यमातून ओरिजिनल ॲप्ससारखा इंटरफेस, पेमेंट स्क्रीन आणि अगदी ट्रान्जॅक्शन साऊंडसुद्धा असतो. सायबर गुन्हेगाराकडून अशा ॲप्सचा वापर केला जात आहे. यातून अनेकांना गंडा घातला जातो.
पेमेंट ॲपवर ओरिजनल सारखा इंडस्फेस, टोन, हिस्टरी...
ओरिजनलसारखा इंडस्फेस, टोन, हिस्टरी दाखवत सायबर गुन्हेगारांकडून गंडविण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. डमी पेमेंट अॅपच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत आहे.
दुकानदार, छोटे, मध्यम स्वरूपाचे व्यापारी अधिक लक्ष...
बनावट ॲप्सचा वापर करून पेमेंट करण्याचा धोका हा दुकानदार, छोटे आणि मध्यम स्वरूपाच्या व्यापाऱ्यांना अधिक आहे. सायबर गुन्हेगार हा डमी ॲप्सचा वापर करत त्यांची फसवणूक करू शकतो.
तर पेमेंट खरे की खोटे, नेमके कसे ओळखता येईल...
बनावट, डमी पेमेंट ॲपपासून सावध राहण्याची गरज आहे. ते पेमेंट खरे की खोटे, हे ओळखण्यासाठी आपण दक्षता बाळगावी. संशय वाटला तर प्रतिसाद नको.
ऑनलाइन पेमेंट स्वीकारताना ही खबरदारी घेण्याची गरज
आपण ज्यावेळी ऑनलाइन पेमेंट स्वीकारत आहात, त्यावेळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशावेळी डमी पेमेंट ॲप्सचा वापर होण्याचा धोका अधिक असतो.
कोठे करावी रितसर तक्रार...
ऑनलाइन पेमेंट करताना एखाद्याने आपली फसवणूक केली तर तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात, सायबर सेलकडे तक्रार करता येईल.
सहा महिन्यात अनेकांना गंडा...
जानेवारी ते जूनअखेर सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना गंडविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऑनलाईन गंडा घातल्याने लाखो रुपयांनी फसवणूक झाली आहे.
पेमेंटचा मेसेज आल्याशिवाय व्यवहार पूर्ण मानू नका...
एखाद्याने ऑनलाइन पेमेंट केले तर मोबाइलवर पेमेंटचा मेसेज आल्याशिवाय, आपल्या खात्यावरील रक्कम चेक करावा.