पावसामुळे शाळांना सुटी

By रवींद्र चांदेकर | Updated: July 19, 2024 11:07 IST2024-07-19T11:07:17+5:302024-07-19T11:07:53+5:30

Vardha : सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर

Schools are closed due to rain | पावसामुळे शाळांना सुटी

Schools are closed due to rain

वर्धा : अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

समुद्रपुर, हिंगणघाट, वर्धा, देवळी, सेलू तालुक्यातील शाळांना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही सुटी जाहीर केली. सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी नोंद घेण्याचे आदेश दिले. तसेच सर्व पालक व विद्यार्थ्यांना तशा सुचवा देण्याचे निर्देश दिले आहे. ज्या शाळा सकाळच्या पाळीत आहेत, त्या शाळांनी पाऊस कमी होईपर्यंत शाळेतुन मुलांना सुट्टी देऊ नये, असेही आदेश देण्यात आले आहे.

Web Title: Schools are closed due to rain