नात्याला काळीमा; पुतण्याने केला काकूवर अत्याचार, आरोपीस ठोकल्या बेड्या

By चैतन्य जोशी | Updated: September 14, 2022 17:46 IST2022-09-14T17:43:55+5:302022-09-14T17:46:15+5:30

खापरी (ढोणे) गावातील घटना

Nephew arrested for aunt's rape in wardha | नात्याला काळीमा; पुतण्याने केला काकूवर अत्याचार, आरोपीस ठोकल्या बेड्या

नात्याला काळीमा; पुतण्याने केला काकूवर अत्याचार, आरोपीस ठोकल्या बेड्या

वर्धा : शेतात निंदणीचे काम करणाऱ्या काकूवर तिच्याच सख्ख्या पुतण्याने अत्याचार केल्याची नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना खापरी (ढोणे) गावात घडली. याप्रकरणी दहेगाव पोलिसांनी १४ रोजी नराधम पुतण्यास अटक केल्याची माहिती दिली.

४५ वर्षीय महिला व तिचे जावई हे दोघे त्यांच्या मालकीच्या शेतात पऱ्हाटीच्या पिकाला निंदण करीत होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत शेतात निंदणीचे काम केल्यावर जावई घरी जेवण करण्यास निघून गेले. पीडित महिला शेतात एकटीच होती. दरम्यान वासनांध पुतण्याने शेतात प्रवेश करुन काकूशी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. काकूने हटकले असता पुतण्याने बळजबरीने काकूवर अत्याचार केला.

घाबरलेल्या काकूने पळ काढून ही बाब तिच्या भासऱ्यांना सांगितली. मात्र, तोपर्यंत आरोपी पुतण्याने तेथून पळ काढला होता. १३ रोजी रात्रीच्या सुमारास पीडितेने दहेगाव पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपी पुतण्याचा शोध घेत त्यास १४ रोजी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगेश कामाले यांनी दिली.

Web Title: Nephew arrested for aunt's rape in wardha