पत्नीला आणायला निघाला, पुरात दुचाकीसह वाहून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 17:42 IST2023-09-09T17:41:02+5:302023-09-09T17:42:05+5:30

विखणी गावाजवळील घटना

man swept away in flood along with the bike | पत्नीला आणायला निघाला, पुरात दुचाकीसह वाहून गेला

पत्नीला आणायला निघाला, पुरात दुचाकीसह वाहून गेला

समुद्रपूर (वर्धा) : भावाला राखी बांधण्याकरिता गेलेल्या पत्नीला परत आणण्याकरिता दुचाकीने जात असलेला पती नाल्याच्या पुरात वाहत गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास विखणी गावाजवळ घडली.

गणेश मसराम (४०) रा. हिंगणा हे विखणी येथे रूपाजी आडे यांच्याकडे पत्नीला घेण्याकरिता येत होते. गावाजवळील नाल्याला पूर असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांनी पूर असलेल्या नाल्याच्या पुलावरून दुचाकी टाकल्याने ते दुचाकीसह पुरात वाहून गेले. त्यांची दुचाकी नाल्यावर अडकून दिसल्याने ते वाहत गेल्याचा अंदाज गावकऱ्यांना आला. त्यामुळे शोधाशोध सुरू केली असता ५०० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार राजेंद्र सयाम, मंडळ अधिकारी निनावे, तलाठी धोंगडी यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह व दुचाकी बाहेर काढली. या संदर्भात सिंदी पोलिसांना सूचना दिली असता पोलिसांनीही विखणी येथे पोहचून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनाकरिता समुद्रपुरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: man swept away in flood along with the bike