Lok Sabha Election 2019; छुपी बंडखोरी करणार काँग्रेसचा ‘गेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:12 PM2019-04-08T22:12:44+5:302019-04-08T22:13:42+5:30

बंडखोरीने पूर्वीपासूनच पछाडलेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत पुन्हा पक्षातील अंतर्गत बंडखोरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाढला आहे. त्यामुळे विद्यमान काँग्रेस नेतृत्वाने जाती-पातीचा आधार घेत पक्षातील संशयित पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचे कामच काढून घेतले आहे. याचा पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवा नेते व त्यांचे समर्थक मागील दोन दिवसांपासून खुलेआम आघाडीविरोधात प्रचार करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या अडचणी वाढतच आहेत.

Lok Sabha Election 2019; Congress 'game' to reveal hidden rebellion | Lok Sabha Election 2019; छुपी बंडखोरी करणार काँग्रेसचा ‘गेम’

Lok Sabha Election 2019; छुपी बंडखोरी करणार काँग्रेसचा ‘गेम’

Next
ठळक मुद्देकाँग्रेसच्या विरोधात ‘राष्ट्रवादी’ खुलेआम मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बंडखोरीने पूर्वीपासूनच पछाडलेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत पुन्हा पक्षातील अंतर्गत बंडखोरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाढला आहे. त्यामुळे विद्यमान काँग्रेस नेतृत्वाने जाती-पातीचा आधार घेत पक्षातील संशयित पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचे कामच काढून घेतले आहे. याचा पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवा नेते व त्यांचे समर्थक मागील दोन दिवसांपासून खुलेआम आघाडीविरोधात प्रचार करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या अडचणी वाढतच आहेत.
काँग्रेसमध्ये पूर्वी प्रभाराव यांचा प्रबळ गट होता. त्यांचा व्यापक जनसंपर्क होता. विविध जाती-पंथाच्या लोकांना त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आणले होते. विविध मतदारसंघात त्या कौटुंबिक नातेसंबंध जपत कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर ही परंपंरा खंडित झाली. काँग्रेस जिल्ह्यात तीन गटांत विभागली. यात आमदार रणजित कांबळे, आमदार अमर काळे, शेखर शेंडे यांच्या गटांचा समावेश आहे. या तिघांमधून विस्तवही जात नाही, अशी आज स्थिती आहे. राहुल गांधींच्या गांधीजयंतीच्या सभेनंतरही काँग्रेसमधील वाद उफाळून आला. आता निवडणुकीत टोकस यांना गरज असल्याने शेंडे, काळे यांची मदत घेण्याची नमती भूमिका रणजित कांबळे यांनी घेतली. परंतु, या दोन्ही गटांना कांबळे यांच्याकडून दुय्यम वागणूक दिली जात असल्याची पक्षांतर्गत खदखद बाहेर येत आहे. दुसरीकडे देवळी-पुलगाव मतदारसंघात रणजित कांबळेंची मक्तेदारी संपविण्याचा विडा सहकार गटाने उचलला आहे. ‘कांबळे हटाव’ हा नारा आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत बुलंद करायचा आहे, अशी माहिती सहकार गटाच्याच नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. गटबाजी शमविण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याने हे बंडखोरच काँग्रेसचा गेम करण्याच्या तयारीत आहेत.
अमर काळेनांही काँग्रेस नेतृत्वाचा त्रास
मागील १५ वर्षांपासून आर्वी विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणारे अमर काळे हे काँग्रेसमधील लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. शरद काळे यांच्यापासून काळे कुटुंबीयांनी या मतदार संघात आपली एकहाती सत्ता टिकवून ठेवली. मात्र, काळेंना नेहमी शह देण्याचे काम प्रभाताई राव व रणजित कांबळे यांनी सुरू ठेवले. डॉ. काळे यांच्या निधनानंतर अमर यांना तिकीट मिळू नये इथपासून तर त्यांना मंत्रिपदापासून रोखण्याचेही काम जिल्ह्यातील याच गटाने केल्याची भावना काळे समर्थक उघडपणे मांडत आहेत. या साऱ्या बाबी काँग्रेस उमेदवारासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत.
हिंगणघाटात राष्ट्रवादी दुभंगली
हिंगणघाट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार राजू तिमांडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.सुधीर कोठारी यांच्या गटात दुभंगली आहे. त्यामुळे कोठारींकडे काँग्रेसने काम सोपविले आहे. तिमांडे राहुल गांधीच्या सभेला आले, परंतु काँग्रेस नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास नाही, अशी परिस्थिती त्यांच्या समर्थकांनीच कथन केली आहे. दुसरीकडे शेखर शेंडे यांच्या वर्धा विधानसभा मतदारसंघात शेंडे यांना अडचणीचे ठरणारे जि. प. चे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल व शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर पांगुळ यांना विधानसभेचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याचे काम युद्धपातळीवर रणजित कांबळे करीत आहेत. या दोन्ही नेत्यांची राहुल गांधींसह अशोक चव्हाण यांच्याशी गाठभेट घालून देण्यात आली. शेंडेंना पक्षाच्या प्रचारापासून रोखण्यासाठी कांबळे यांनी ही खेळी खेळल्याचे शेंडेंचे सेलू तालुक्यातील समर्थक उघडपणे बोलत आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; Congress 'game' to reveal hidden rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.