Lok Sabha Election 2019; सिनेअभिनेत्री अमिषा पटेलचा ‘रोड शो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:28 IST2019-04-09T22:27:38+5:302019-04-09T22:28:52+5:30
भाजपच्या प्रचारासाठी मंगळवारी अभिनेत्री अमिषा पटेलने हजेरी लावली. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी तिने खुल्या जीपवरून रोड शो केला. यावेळी बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.

Lok Sabha Election 2019; सिनेअभिनेत्री अमिषा पटेलचा ‘रोड शो’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भाजपच्या प्रचारासाठी मंगळवारी अभिनेत्री अमिषा पटेलने हजेरी लावली. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी तिने खुल्या जीपवरून रोड शो केला. यावेळी बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदारसंघात प्रचाराचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. शिवसेना-रिपाइ-भाजप युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराकरिता सिने अभिनेत्री अमिषा पटेल आली होती. शहरातील मुख्य मार्गाने बाईक रॅलीसह रोड शो करीत प्रचारात ती सहभागी झाली.
भाजपच्या वतीने लोकसभा मतदारसंघात बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. मतदारांना आकर्षित करण्यात आले. छोट्या शहरांमध्ये चित्रपट ातील नट-नट्यांचे मोठे आकर्षण असते. याचा फायदा घेत यांचा चेहरा मतदारसंघात दाखवत मत मागण्यासाठी मतदारांना आकर्षित करण्याचे काम करण्यात आले.
रोड शोमध्ये प्रशांत बुर्ले, नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, नगरसेवक वरूण पाठक व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.