अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 17:48 IST2022-06-07T17:32:49+5:302022-06-07T17:48:02+5:30
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली.

अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल
वर्धा : बदनामी करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीस वरोरा येथे पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी ६ रोजी हिंगणघाट पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी चेतन महादेव फरकाडे हा पीडितेसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत असताना त्याने स्क्रीनशॉट काढले तसेच पीडितेच्या इन्स्टाग्राम या सोशल साईट वरील तिचे अकाउंटवरील तिचे व्हिडीओ डाउनलोड करुन तिला तुझी बदनामी करेल, अशी धमकी देत होता.
पीडितेने आरोपी चेतनला समजाविण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकायला तयार नव्हता. अखेर त्याने पीडितेला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून वरोरा येथे नेले तेथे त्याच्या मामाकडे जात पीडितेवर बळजबरी अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले. पोलसांनी घटनेचे गांभीर्य पाहता आरोपी चेतनविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.