अवैध सावकारकीचा उच्छाद; सावकारांचे ५० कोटी 'ब्लॅक' केवळ २७.७३ कोटी 'व्हाइट मनी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 17:42 IST2024-09-27T17:39:42+5:302024-09-27T17:42:19+5:30
सावकारीचे अवघे १४२ परवाने : जिल्ह्यात अवैध सावकारीला आला ऊत

Crackdown on illegal moneylending; 50 Crores of Lenders 'Black' Only 27.73 Crores of 'White Money'
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवैध सावकारकीचा उच्छाद सुरू आहे. यातून सहकार विभागाकडे ऑगस्ट अखेरपर्यंत १५० तक्रारी आल्या. चौकशी करून संबंधितांवर कारवाईचा बडगाही उगारला जातो आहे. जिल्ह्यात केवळ १४२ परवानाधारक सावकार असून, त्यांनी २४,२७४ नागरिकांना २७ कोटी ७३ लाखांचे कर्ज वाटप केल्याचे समोर ५० आले आहे. गावोगावी तयार झालेल्या खासगी सावकार आणि त्यांनी वाटलेल्या कर्जाचा आकडा हा ५० कोटींच्या पुढे असू शकतो, असा अंदाज आहे.
जिल्ह्यात अवैध सावकारी हा गंभीर विषय बनला आहे. त्यांच्या अव्वाच्या सव्वा व्याजदरामुळे अनेकांनी मरणाला कवटाळल्याचेही ऐकिवात आहे. त्यामुळेच आतापर्यंत जिल्हाभरातून अवैध सावकारीच्या तब्बल १५० तक्रारी सहकार विभागाकडे प्राप्त आहेत. यापैकी १३ प्रकरणे पोलिसांकडे सुपूर्द केली असून, तीन प्रकरणात गुन्हा दाखल आहे. मात्र, अजूनही काही प्रकरणे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी खासगी सावकारी बोकाळल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. तर दुसरीकडे परवानाधारक सावकारांचे व्यवहार हे 'व्हाइट' दाखवले जात आहेत. जिल्ह्यात १४२ सावकार शेतकरी, व्यापाऱ्यांना कायद्यानुसार कर्ज पुरवठा करत
खासगी सावकारकी आणि गळ्याला फास
सध्या अनेक तालुक्यात १०० रुपयांना १० ते २० टक्केप्रमाणे व्याजदाराने खासगी सावकार कर्जपुरवठा करत आहेत. त्यासाठी गहाणखतही केले जात असल्याची चर्चा आहे. उद्योग, व्यवसाय तसेच शेतीसाठी घेतलेल्या या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत जाऊन यातून वादाला तोंड फुटून गुन्हेगारीचा जन्म होत असल्याचा दाखला नुकताच रामनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून दिसून आला. त्यामुळे उपनिबंधक यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या 'त्या' खासगी सावकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोहीम हाती घेण्याची मागणी होताना दिसून येत आहे. काही तज्ज्ञांच्या मते प्रत्येक तालुक्यात ५ कोटींपेक्षा अधिक व्यवहार हे खासगी सावकारांचे असल्याचे सांगण्यात येते. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
तालुकानिहाय परवानाधारक सावकार ५० १४
वर्धा - ५०
देवळी - ३२
आर्वी - १२
कारंजा - १०
आष्टी - ०७
सेलू - १०
समुद्रपूर - ०६
हिंगणघाट - १४
कर्जदारांची संख्या आणि उचललेले कर्ज
तालुका कर्जदार रक्कम ३.३६४
वर्धा ३३६४ ३८०. २१
देवळी १०,२०१ ११७२.३८
आर्वी २४६ २८.६३
कारजा ४,९०० ४७१.००
आष्टी २३१ २८.८८
सेलू २,४०६ ३६२.००
समुद्रपूर २,०८४ २२४.३९
हिंगणघाट ८४२ १०६.१३
परवाना सावकारकी कायदा काय सांगतो ?
परवानाधारक सावकाराने तारण कर्ज केले तर वर्षासाठी ९ टक्केपेक्षा जास्त दराने व्याज आकारू नये, विनातारण कर्ज असेल तर १२ टक्केप्रमाणे व्याजाने व्यवहार अपेक्षित आहे. तसेच शेत- कांशिवाय अन्य व्यक्तींना कर्ज द्यायचे झाल्यास त्यांना तारण कर्ज असेल, तर १५ टक्के आणि विनातारण कर्जासाठी १८ टक्के प्रमाणे प्रतिवर्षी व्याज आकारले जावे, या व्यवहाराची माहिती सहकार विभागाला द्यावी लागते.