दुभाजकावर आदळली कार, चालक ठार 4 जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 18:18 IST2021-06-10T18:18:22+5:302021-06-10T18:18:52+5:30
यशोदा नदीजवळील घटना, महामार्गावरील दुभाजकावर कार आदळल्याने अपघात

दुभाजकावर आदळली कार, चालक ठार 4 जण गंभीर जखमी
देवळी (वर्धा) : स्थानिक यशोदा नदीच्या पलीकडे यवतमाळ महामार्गाचे दुभाजकावर मारुती सुझुकी कार आदळून यामध्ये गाडीचा चालक जागीच ठार झाला. तसेच गाडीतील दोन महिला व दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारचे सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. जखमींना सावंगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिस सुत्रांनुसार यवतमाळमार्गे एम. एच. 38-1980 या क्रमांकाची मारोती सुझुकी मोटर कार देवळीकडे येत असताना यशोदा नदीजवळ रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात गाडी चालक राहुल पोहरे (३७) रा. प्रजापती नगर यवतमाळ हा जागीच ठार झाला. तसेच गाडीतील स्मिता राहुल पोहरे (३४), आरती रवी पोहरे(३०), अधिक रवी पोहरे (३) अश्मीका पोहरे (८) सर्व रा. प्रजापती नगर यवतमाळ हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सावंगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षण तिरुपती राणे करीत आहे.