Namo Shetkari Yojana: शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:07 IST2025-03-04T17:52:52+5:302025-03-04T18:07:10+5:30

Namo Shetkari Yojana: मिळाले २६ कोटी : २७७२ शेतकऱ्यांची केवायसी पेंडिंग

19th installment of Shetkari Samman Nidhi Yojana deposited in beneficiary account | Namo Shetkari Yojana: शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

19th installment of Shetkari Samman Nidhi Yojana deposited in beneficiary account

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला. वर्धा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ७३५ शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी करण्यासाठी हातभार लागला आहे.


जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण २६ कोटी ९४ लाख ७० हजार रुपये मिळाले आहे. शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अनिश्चित असते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी करण्यासाठी अडचणी येत असतात. 


बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे शेतातील किरकोळ खर्च करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हाल होत असतात. मात्र, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांना हातभार मिळाला आहे. सन्मान निधी पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यात निधी जमा झाल्यामुळे त्यांना अडचणीत कोणापुढे हात पसरवण्याची गरज भासत नाही.


९८ टक्के शेतकऱ्यांची केवायसी झाली पूर्ण
योजनेच्या लाभासाठी बँकेत खात्याला आधार, पॅनकार्ड संलग्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ९८ टक्के शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे.


अनेक शेतकऱ्यांकडून केले पैसे वसूल
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी आयकर भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत. आयकर भरणाऱ्या या शेतकऱ्या कडून शासनाने सुरुवातीपासूनची रक्कम वसूल केली आहे.


जिल्ह्यात लाभार्थ्यांचा आकडा एक लाखांत
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात एक लाख ३७ हजार ५०७ एवढी आहे. दिवसागणीत यात वाढ होत आहे.


हजारांवर लाभार्थी घटले
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नियम व अटीमध्ये न बसणाऱ्या काही शेतकऱ्यांचे व काही शेतकऱ्यांचा अकाली मृत्यू झाल्याने योजनेचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामुळे योजनेतून हजारांवर लाभार्थी घटले आहेत. पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.


तालुकानिहाय पात्र लाभार्थी संख्या
तालुका         १९ वा हप्ता

आर्वी                १६,५४३
आष्टी                १०,४७४
देवळी              १७,७५५
हिंगणघाट         २०,५६९
कारंजा             १८,३४३
समुद्रपूर           १९,३७७
सेलू                 १५,३०१
वर्धा                 १६,५९७


१९ वा हप्ता मिळाला
वर्धा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी १ लाख ३४ हजार ७३५ शेतकरी पात्र आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांची केवायसीसह अन्य कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. यामुळे काही शेतकरी लाभापासून वंचित आहेत.
 

Web Title: 19th installment of Shetkari Samman Nidhi Yojana deposited in beneficiary account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.