मनेका गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १४ हजार मतांनी जिंकल्या होत्या, आता?

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: May 24, 2024 01:11 PM2024-05-24T13:11:07+5:302024-05-24T13:12:03+5:30

मतदारसंघात ब्राह्मण व दलित मतांचा टक्का जास्त आहे. त्यामुळे त्यांची मत या ठिकाणी निर्णायक ठरु शकतात. 

Maneka Gandhi won the last Lok Sabha election by only 14 thousand votes, now? | मनेका गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १४ हजार मतांनी जिंकल्या होत्या, आता?

मनेका गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १४ हजार मतांनी जिंकल्या होत्या, आता?

लखनाै : सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा मनेका गांधी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात सपाचे राम भूवाल निषाद हे उमेदवारी करीत आहे. भाजप नेते व याच मतदारसंघाचे माजी खासदार वरुण गांधी यांनी मनेका यांच्या प्रचारात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

बसपाकडून उदयराज वर्मा यांना उमेदवारी देण्यात आल्यानं येथील निवडणूक तिरंगी होणार आहे. देवेंद्र बहादुर राय यांचा अपवाद वगळता मतदारसंघात कुठलाही उमेदवार दुस-यांदा निवडून आलेला नाही. त्यामुळे यंदा मनेका गांधी यांनी सुलतानपूरमधून विजय मिळवला, तर मतदारसंघात इतिहास घडेल. मनेका गांधी व राम भूवाल निषाद हे दोन्हीही बाहेरील उमेदवार असल्याने हाही एक चर्चेचा विषय ठरत आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
 मनेका गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १४ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या, त्यामुळे यंदा त्यांना विजयाचे मार्जिन वाढवण्याचे आव्हान आहे. महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यावर ॲन्टी इनकबंन्सी निर्माण झाल्याने याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात ब्राह्मण व दलित मतांचा टक्का जास्त आहे. त्यामुळे त्यांची मत या ठिकाणी निर्णायक ठरु शकतात. 

२०१९ मध्ये काय घडले?
मनेका गांधी, भाजप (विजयी) - ४,५९,१९६
चंद्र भद्र सिंह, बसपा (पराभूत) - ४,४४,६७०

Web Title: Maneka Gandhi won the last Lok Sabha election by only 14 thousand votes, now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.