Pimpari-chinchwad : महापालिका निवडणुकीत आरक्षित जागांवरही भाजपचेच वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 11:35 IST2026-01-24T11:35:10+5:302026-01-24T11:35:50+5:30

एससी-एसटी प्रवर्गात भाजप आघाडीवर, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

Pimpri Chinchwad Municipal Corporation Election BJP dominates reserved seats in municipal elections | Pimpari-chinchwad : महापालिका निवडणुकीत आरक्षित जागांवरही भाजपचेच वर्चस्व

Pimpari-chinchwad : महापालिका निवडणुकीत आरक्षित जागांवरही भाजपचेच वर्चस्व

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ६९२ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. त्यातील ३२ प्रभागांमधील आरक्षित जागांवर सर्वपक्षीय १८३ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यामधून एकूण २३ जागांवर उमेदवार निवडून आले. या २३ जागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील २० (पुरुष १०, महिला १०) आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील तीन (पुरुष १, महिला २) जागांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती (एससी)-अनुसूचित जमाती (एसटी) या आरक्षित जागांमध्ये भाजपने स्पष्ट वर्चस्व दाखवले आहे. भाजपने रिपब्लिकन पक्षाशी (आठवले गट) युती करून कमळ चिन्हावर एकूण २३ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १७ जण विजयी झाले. एससी पुरुष गटातील १० जागांसाठी भाजपने १० उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ७ जागांवर विजय मिळवला, तर ३ ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. एससी महिला गटात भाजपने १० पैकी ८ जागा जिंकल्या. एसटी पुरुषांसाठी असलेल्या एकमेव जागेवर भाजपचा उमेदवार विजयी ठरला. मात्र, एसटी महिलांच्या २ जागांपैकी भाजपला १ जागेवर समाधान मानावे लागले.

राष्ट्रवादी (अजित पवार) दुसऱ्या क्रमांकावर

आरक्षित जागांवर भाजपनंतर राष्ट्रवादी (अजित पवार) दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पक्षाने एकूण २२ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ५ उमेदवार निवडून आले. यामध्ये एससी पुरुष प्रवर्गात ९ उमेदवारांपैकी ३ उमेदवार विजयी झाले. एससी महिला प्रवर्गात १० पैकी केवळ २ उमेदवार निवडून आले. एसटी पुरुष गटात दिलेला उमेदवार पराभूत झाला, तर एसटी महिला गटात २ पैकी १ उमेदवार विजयी झाला.

इतर सर्वच पक्षांना अपयश

आरक्षित जागांवर इतर सर्व पक्षांना तसेच अपक्ष उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. एकूण ६२ अपक्ष उमेदवारांनी आरक्षित जागांवर निवडणूक लढवली, मात्र एकालाही यश मिळाले नाही. शिंदेसेना (१४), काँग्रेस (१२), वंचित (१३), उद्धवसेना (१२), आप (७), बसप (७), राष्ट्रवादी (शरद पवार) (३) तसेच इतर छोट्या पक्षांनी मिळून ९ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, या सर्वांच्या पदरी निराशाच पडली.

आंबेडकरी पक्षांना फटका

या निवडणुकीत आंबेडकरी चळवळीशी नाते सांगणारे वंचित बहुजन आघाडी, बसप, आदी पक्षांनीही जोरदार तयारी केली होती. मात्र, हक्काच्या आरक्षित मतदारसंघातही या पक्षांना अपेक्षित यश मिळाले नाही. या पक्षांचे सर्वच उमेदवार पराभूत झाले.

आरक्षित जागांवरील निकाल 

जागा प्रवर्ग : एससी (पुरुष)

पक्ष उमेदवार विजयी

भाजप १० ७

राष्ट्रवादी (अ.प.) ९ ३

शिंदेसेना ८ ०

काँग्रेस ७ ०

वंचित ७ ०

अपक्ष ४० ०

एकूण ६८ १०

----

जागा प्रवर्ग : एससी (महिला)

पक्ष उमेदवार विजयी

भाजप १० ८

राष्ट्रवादी (अ.प.) १० २

उद्धवसेना ६ ०

काँग्रेस ५ ०

वंचित ५ ०

बसप ४ ०

आप ५ ०

अपक्ष २१ ०

एकूण ६६ १०

----

जागा प्रवर्ग : एसटी (पुरुष)

पक्ष उमेदवार विजयी

भाजप १ १

राष्ट्रवादी (अ.प.) १ ०

इतर ६ ०

एकूण ८ १

---

जागा प्रवर्ग : एसटी (महिला)

पक्ष उमेदवार विजयी

भाजप २ १

राष्ट्रवादी (अ.प.) २ १

शिंदेसेना १ ०

मनसे २ ०

इतर १ ०

एकूण ८ २

Web Title : पिंपरी-चिंचवड मनपा चुनाव में आरक्षित सीटों पर भाजपा का दबदबा

Web Summary : भाजपा और रिपब्लिकन पार्टी गठबंधन ने पिंपरी-चिंचवड की आरक्षित सीटों पर जीत हासिल की। 23 में से 17 सीटें जीतकर, एससी और एसटी श्रेणियों में दबदबा बनाया। राकांपा दूसरे स्थान पर रही।

Web Title : BJP Dominates Reserved Seats in Pimpri-Chinchwad Municipal Elections

Web Summary : BJP, allied with the Republican Party, swept Pimpri-Chinchwad's reserved seats. Winning 17 of 23, dominating SC and ST categories. NCP secured second position.