उल्हासनगरात वंचित उमेदवारांचे बॅनर्स काढल्याने, पोलीस व कार्यकर्त्यांत तू तू मै मै
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 19:50 IST2024-11-16T19:49:56+5:302024-11-16T19:50:33+5:30
उल्हासनगर मतदारसंघाचे उमेदवार संजय गुप्ता यांच्या प्रचारार्थ शहरभरात प्रचार बॅनर लावण्यात आले. मात्र विनापारवाना बॅनर्स लावल्याचा ठपका ठेवून दुपारी पोलीस बंदोबस्तात बॅनर्स काढण्यास निवडणूक कर्मचाऱ्यांनी सुरवात केली.

उल्हासनगरात वंचित उमेदवारांचे बॅनर्स काढल्याने, पोलीस व कार्यकर्त्यांत तू तू मै मै
सदानंद नाईक
उल्हासनगर : उल्हासनगर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे बॅनर्स काढल्याने, पोलीस व कार्यकर्त्यांत तू तू मै मै झाली. वंचितचे शहराध्यक्ष उज्वल महाले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.
उल्हासनगर मतदारसंघाचे उमेदवार संजय गुप्ता यांच्या प्रचारार्थ शहरभरात प्रचार बॅनर लावण्यात आले. मात्र विनापारवाना बॅनर्स लावल्याचा ठपका ठेवून दुपारी पोलीस बंदोबस्तात बॅनर्स काढण्यास निवडणूक कर्मचाऱ्यांनी सुरवात केली. या कारवाईला वंचितचे शहराध्यक्ष उज्वल महाले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवीला. यावेळी पोलीस व वंचित मध्ये ततू तू मै मै झाली. असे शहराध्यक्ष उज्वल महाले यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून महाले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले होते. नंतर सोडून देण्यात आले. याप्रकराणे काही काळ तणाव निर्माण झाला होता.