मॉर्निंग वॉकसोबत मतदान; अनेक ठिकाणी मशीन बंद, मशीन वरील क्रम चुकले मतदारांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:27 IST2026-01-15T10:26:55+5:302026-01-15T10:27:25+5:30
ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच नोकरदार वर्गाने यावेळी आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिले. मॉर्निंग वॉक आटोपून किंवा चालताना थेट मतदान केंद्र गाठत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.

मॉर्निंग वॉकसोबत मतदान; अनेक ठिकाणी मशीन बंद, मशीन वरील क्रम चुकले मतदारांना मनस्ताप
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदानाला सुरुवात होताच शहरात लोकशाहीचा उत्साह दिसून आला. ठाणे, घोडबंदर रोड, कळवा आणि मुंब्रा परिसरातील नागरिक रोजच्या सवयीनुसार पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले आणि चालता-चालताच त्यांनी जवळच्या मतदान केंद्रांचा रस्ता धरत मतदानाचा हक्क बजावला. मात्र शहरातील घोडबंदर असेल बाळकुम असेल कोलशेत अगदी नौपाडा भागात देखील अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या मशीनला करंट येण्याच्या मशीनला एरर येण्याच्या तक्रारी आल्या त्यामुळे सकाळी पहिल्या सत्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केलेल्या नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले.
ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच नोकरदार वर्गाने यावेळी आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिले. मॉर्निंग वॉक आटोपून किंवा चालताना थेट मतदान केंद्र गाठत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. ‘आरोग्य राखा आणि मतदान करा’ असा संदेश यानिमित्ताने नागरिकांनी कृतीतून दिला.
दरम्यान, अनेक सोसायट्यांबाहेर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदार सहाय्य बूथ उभारले होते. या ठिकाणी छोट्या प्रिंटिंग मशीनद्वारे मतदारांना मतदार पावत्या देण्यात येत होत्या. त्यामुळे या बूथवरही सकाळपासून नागरिकांची गर्दी दिसून आली.
मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक अडचण दिसून आली. प्रभाग क्रमांक ३ मधील सेंट झेवियर्स शाळेतील खोली क्रमांक १० आणि १२ येथे मतदानासाठी ठेवलेल्या यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. एका यंत्रात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, तर दुसऱ्या यंत्राला विद्युत प्रवाह जाणवत असल्याचे आढळून आले. या कारणामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. सुमारे अर्ध्या तासानंतर दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आले.
ठाण्यातील नौपाडा भागातील सरस्वती विद्यालय मधील मशीन मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली होती. दीड तासापासून मतदार रांगेत उभे असल्याने मतदारांमध्ये संताप, अनेक मतदार मतदान न करता परताना पाहायला मिळाले.
याचा फटका मनसे नेते अविनाश जाधव यांना देखील बसला.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये ब्लॉसम शाळा मध्ये 3 ते 4 मशीन मध्ये एरर होता 10 ते 15 मिनिटे उशीर झाला. कोलशेत मध्ये खालचा गाव मनपा शाळा दिड तास उशिराने मतदान सुरू झाले तीन ते चार मशीन मध्ये एरर आले होते, लोढा, यशस्वी नगर, बाळकुम मध्ये देखील असा प्रकार घडला.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिरीयल नंबर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले होते मनोरमा नगर मध्ये ज्ञानपीठ विद्यालय मध्ये हा प्रकार झाला होता अ ब क ड क्रम चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला होता. त्यामुळे मतदान 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू झाले.
काजूवाडी येथे बोगस मतदार पकडला आहे. मतदार मतदान करण्यासाठी गेला असता त्याच्या नावाने आधीच त्याचे मतदान झाले होते. प्रभाग 14 मध्ये, आर जे ठाकूर ला 2 मशीन बंद झाल्या होत्या, 1 तास बंद होते, लोक मतदान न करता परत गेले.
६४९ उमेदवार निवडणूक रिंगणात -
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १६ लाख ४९ हजार ८६९ मतदार आहेत. यामध्ये ८ लाख ६३ हजार ८७८ पुरुष, ७ लाख ८५ हजार ८३० महिला आणि १५९ इतर मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी ९ प्रभागांमध्ये ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये कार्यरत आहेत. एकूण ११०७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत ९९ अर्ज बाद झाले, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत २६९ उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी, अंतिम टप्प्यात ६४९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये शिंदे सेनेचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.