मेळाव्याला उशीर; भाजप आमदाराला न बोलण्याची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:44 IST2026-01-02T16:44:02+5:302026-01-02T16:44:50+5:30
Ulhasnagar Municipal Corporation Election: टाऊन हॉलमधील भाजप कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दीड तास उशिरा सुरु झाल्याची शिक्षा म्हणून आ. कुमार आयलानी व निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांना भाषणास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मनाई केली. उल्हासनगरच्या विकासासाठी शहर दत्तक घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

मेळाव्याला उशीर; भाजप आमदाराला न बोलण्याची शिक्षा
उल्हासनगर - टाऊन हॉलमधील भाजप कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दीड तास उशिरा सुरु झाल्याची शिक्षा म्हणून आ. कुमार आयलानी व निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांना भाषणास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मनाई केली. उल्हासनगरच्या विकासासाठी शहर दत्तक घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
भाजपाचा कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दुपारी १२ वाजता आयोजित केला होता. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी चव्हाण साडेअकरा वाजता टाऊन हॉलला हजर होते. मात्र, पक्षाचे स्थानिक नेते, उमेदवार, पदाधिकारी यांचा पत्ता नव्हता. गर्दी जमवताना शहराध्यक्ष राजेश वधारिया यांची दमछाक झाली. कार्यकर्त्यांनी हॉल अर्धा भरण्यापूर्वीच चव्हाण यांनी मेळाव्याला सुरुवात केली.
नेत्यांना वेळेची किंमत नाही
मेळावा दीड तास उशिरा सुरू झाल्याने भाजप नेत्यांना वेळेची किंमत नसल्याने, याची शिक्षा म्हणून आ. आयलानी, रामचंदानी यांना भाषण करता येणार नाही, असे चव्हाण यांनी दोघांना सुनावले.
महापालिकेत ५० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणून भाजपचा महापौर होणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
उद्धवसेनेच्या उपनेत्या व सिनेट सदस्य शीतल देवरुखकर यांचा चव्हाण, पक्षनेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश झाला. त्यांना तिकीट नाकारल्याने, नाराज होऊन त्यांनी भाजप प्रवेश केला.