उल्हासनगरात तांत्रिक कारणाने भाजपचे कमळ चिन्हे दुसऱ्याला, अधिकृत उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 15:33 IST2026-01-04T15:33:08+5:302026-01-04T15:33:28+5:30
महापालिका प्रभाग क्रं-१९ मध्ये भाजपचा गोंधळ

उल्हासनगरात तांत्रिक कारणाने भाजपचे कमळ चिन्हे दुसऱ्याला, अधिकृत उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर भाजपाच्या तांत्रिक चुकीने एबी फॉर्म बंटी कुर्सीजा यांच्या पत्नीला जाऊन, त्यांना प्रभाग क्रं-१९ मध्ये कमळ चिन्हे मिळाले. कमळाचे चिन्हे मिळालेल्या कुर्शीजा अधिकृत उमेदवार नसून अपक्ष असलेल्या कोमल लहरानी भाजपचे उमेदवार असल्याचे स्पष्टीकरण भाजपाने दिले.
उल्हासनगर भाजपा मंडळ अध्यक्ष बंटी कुर्सीजा असून त्यांच्या पत्नी लक्ष्मी कुर्सीजा यांना प्रभाग क्रं-१९ मधून एबी फॉर्म दिला. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना पक्षाचे कमळ चिन्हे मिळाले. त्यानंतर भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांना कुर्सीजा हे अधिकृत उमेदवार नसल्याचे जाहीर करून, अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या कोमल लहरानी यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. त्यानंतर कुर्सीजा यांची मंडळ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करून, सिंधू शर्मा यांची मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती केली. कुर्सीजा यांनी उमेदवारी मागे घेतली नसून कमळ चिन्हावर निवडणूक लढवून जिकूंन येण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच पक्ष निष्ठावंटाला डावलून अन्य पक्षातून भाजपात आलेल्याची उमेदवारी अधिकृत केल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
तांत्रिक चूक: राजेश वधारिया
प्रभाग क्रं-१९ मध्ये पक्षाने कोमल लहरानी यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते. मात्र चुकीने एबी फॉर्म बंटी कुर्सीजा यांच्याकडे गेल्यावर त्यांनी पत्नी लक्ष्मी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. नियमानुसार त्यांना पक्षाचे चिन्हे मिळाले. पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार कुर्सीजा उमेदवार नसून कोमल लहरानी अधिकृत उमेदवार आहेत.