बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 05:55 IST2026-01-05T05:55:11+5:302026-01-05T05:55:11+5:30
ठाण्यात शिंदेसेना आणि भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती.

बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येथील ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी एकूण १४१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ५५ अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता तब्बल ८६ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
ठाण्यात शिंदेसेना आणि भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, महायुतीतील जागावाटपात मिळालेल्या मर्यादित जागांमुळे पक्ष नेतृत्वाला सर्व इच्छुकांना उमेदवारी देणे शक्य झाले नाही. यामध्ये काही निष्ठावंत आणि दीर्घकाळ पक्षासाठी कार्यरत असलेले इच्छुक डावलले गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.
महायुती तसेच आघाडीतील नेत्यांनी बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी प्रयत्न करत सुमारे ९० टक्के बंडखोरी आटोक्यात आणल्याचा दावा केला आहे. मात्र दुसरीकडे, अपक्ष उमेदवारांचे आव्हान कायम असून त्यामुळे प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
हौस म्हणून, तसेच स्थानिक नगरसेवकांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करत अनेकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी एकूण १४१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ५५ अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता प्रत्यक्ष ८६ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.