भाजप-शिंदेसेनेत लागली होती बिनविरोधची चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:15 IST2026-01-03T15:14:44+5:302026-01-03T15:15:15+5:30

ठाणे महापालिकेत आपले शिलेदार बिनविरोध निवडून आणण्यासाठी शिंदे सेनेनी दोन दिवस आधाची फिल्डिंग लावली.

There was an unopposed contest between BJP and Shinde Sena | भाजप-शिंदेसेनेत लागली होती बिनविरोधची चढाओढ

भाजप-शिंदेसेनेत लागली होती बिनविरोधची चढाओढ

ठाणे : कल्याण-डोंबिवलीत भाजपला १४ उमेदवारांना बिनविरोध विजयी करता आल्याने ठाण्यातही बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याकरिता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले व सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले. उद्धवसेना व काँग्रेसच्या उमेदवारांनी मैदान सोडल्याने शिंदेसेनेच्या प्रयत्नांना मोठे यश लाभले.

ठाणे महापालिकेत आपले शिलेदार बिनविरोध निवडून आणण्यासाठी शिंदे सेनेनी दोन दिवस आधाची फिल्डिंग लावली. उमेदवारी अर्ज छाननीत विरोधी पक्षातील काही जणांचे अर्ज बाद झाले. त्याचा फायदा शिंदे सेनेला झाला, गुरुवारी रात्री सुरू झालेल्या बैठकीत चार ते पाच उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची समीकरणे ठरविली.

विरोधी उमेदवारांशी पहाटेच संपर्क
पहाटे चार वाजल्यापासून जे शिल्लक उमेदवार आपल्या पक्षातील उमेदवारांसमोर उभे होते, त्यांना गाठण्याची रणनीती ठरविण्यात आली. काही ठिकाणी उद्धवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी ऐनवेळी कच खाल्ल्याचे दिसले. विरोधी पक्षातील उमेदवारांना माघार घेण्यासाठी त्यांच्या घरापासून ते कुठे असतील त्याठिकाणी जाऊन पहाटेच संपर्क साधून भेटीगाठी घेण्यात आल्या.

Web Title : कल्याण-डोंबिवली, ठाणे में निर्विरोध जीत के लिए भाजपा-शिंदे सेना में होड़

Web Summary : कल्याण-डोंबिवली में भाजपा ने 14 निर्विरोध जीत हासिल की; ठाणे में शिंदे सेना ने सात। उद्धव सेना और कांग्रेस उम्मीदवारों के हटने से शिंदे सेना को मिली जीत। रणनीतिक बैठकों और सुबह-सुबह संपर्क ने विरोधियों को पीछे हटने पर मजबूर किया, जिससे सत्तारूढ़ गठबंधन की निर्विरोध जीत सुनिश्चित हुई।

Web Title : BJP-Shinde Sena Rivalry for Unopposed Wins in Kalyan-Dombivli, Thane

Web Summary : BJP secured 14 unopposed wins in Kalyan-Dombivli; Shinde Sena, seven in Thane. Uddhav Sena and Congress candidates withdrew, aiding Shinde Sena's victory. Strategic meetings and early-morning outreach ensured rivals' retreat, solidifying unopposed wins for the ruling alliance.