मराठी-गुजराती वाद ही तर हिंदुत्वात फूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:42 IST2026-01-03T12:42:32+5:302026-01-03T12:42:57+5:30
ठाणे महापलिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

मराठी-गुजराती वाद ही तर हिंदुत्वात फूट
ठाणे : मराठी व गुजराती हे दोघेही हिंदू असून, भाषिक वाद उपस्थित करून हिंदुत्वात फूट पडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी केला.
ठाणे महापलिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले. उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, एकनाथ शिंदे यांचा उल्लेख सूर्याजी पिसाळ असा करत, दोन गुजरात्यांच्या हाती मुंबई द्यायची नसल्याचे सांगितले. या वक्तव्याचा समाचार घेताना शिंदे म्हणाले की, निवडणुका आल्यावर त्यांना मराठी माणूस आणि मुंबई आठवते.
भावनिक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईसह राज्याला विकासकामांसाठी १० लाख कोटी दिले. मुंबई मोठी झाली तर राष्ट्र मोठे होईल, असे सांगत केंद्राने मुंबईच्या विकासाला चालना दिल्याचे ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी काय केले? उलट यांच्यामुळे मुंबईतील मराठी माणूस हा मुंबईबाहेर फेकला गेला, असे शिंदे यांनी सांगितले.