ठाणे महापालिका निवडणूक; पहिल्या दोन तासात अवघे ८ टक्केच मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:34 IST2026-01-15T12:33:36+5:302026-01-15T12:34:29+5:30
ठाणे महापालिलेच्या ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत.

ठाणे महापालिका निवडणूक; पहिल्या दोन तासात अवघे ८ टक्केच मतदान
ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सकाळच्या सत्रात उत्साह दिसून आला. मात्र मतदान यंत्रांमधील घोळ, ईव्हीएम मशीन बंद पडणे, एरर येणे या त्रुटीमुळे पहिल्या दोन तासात अवघे आठ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली.
ठाणे महापालिलेच्या ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र अगदी घोडबंदर पासून ते कोपरी पर्यंत वागळे, इंदिरानगर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, बाळकुम, कोलशेत, नौपाडा आदींसह इतर भागात ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. काही ठिकाणी मशीन यंत्रणा बंद पडली, काही ठिकाणी एरर येत होते, तर काही ठिकाणी मशीनला शॉक लागण्याचा प्रकारही समोर आला.
त्यामुळे सकाळच्या सत्रात खाजगी कंपनीत कामाला असलेले नोकरदार मतदानासाठी गेले खरे मात्र त्यांना एक ते दोन तास ताटकळत रांगेत उभे राहावे लागल्याने काहींनी मतदान न करताच घरी जाण्याचा मार्ग पत्करला. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीत दिसून आला. पहिल्या दोन तासात अवघ्या 8 टक्के मतदानाची नोंद झाली.