Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:50 IST2026-01-02T14:38:47+5:302026-01-02T14:50:09+5:30
Thane Municipal Corporation Election Results 2026: ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये जोरदार रंगत आली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, ठाण्यात आतापर्यंत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
Thane Municipal Election Results 2026: ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये जोरदार रंगत आली आहे. आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. शेवटच्या दिवशी ठाण्यात राजकीय हालचालिंना वेग आला आहे. कल्याण डोंबिवली पाठोपाठ ठाण्यातही शिंदे सेनेच्या जयश्री रवींद्र फाटक - १८ - ब आणि सुखदा संजय मोरे - १८ - क आणि या दोन महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी आज निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याने जयश्री फाटक यांचा बिनविरोध विजय झाला आहे. ठाण्यात शिवसेनेचे एकुण पाच नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत.
ठाणे महापालिकेतील प्रभाग १८ क च्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुखदा मोरे देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवार वैशाली पवार यांनी घेतली माघार घेतली आहे. तर मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे. यामुळे सुखदा मोरे बिनविरोध विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक १७ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार एकता भोईर बिनविरोध विजयी झाल्या आहेत. एकता भोईर यांच्या समोर कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवार दिलेला नाही. सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे त्यांना बिनविरोध विजयी घोषित केले आहे.
भांडूपमध्ये बंडखोरी
भांडुपमधून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष असलेल्या अनिशा माजगावकर यांच्यासह मनसे माजी नगरसेविका नॉट रिचेबल... आज फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने विरोधका कडून दगा फटका होवू नये म्हणून उमेदवार नॉट रिचेबल आहेत . उद्धव सेनेचे खासदार संजय पाटील यांची कन्या राजोल पाटील यांच्या विरुद्ध 114 मधून त्यानी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.